शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:57 IST

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण होऊन तिसरी फेरी सुरू झाली असली, तरी काही ठराविक महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये उपनगरांमधील अधिक महाविद्यालयांचा समावेश असल्याचे दिसते. पसंतीक्रमात २ ते १० मध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न घेता पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाºया या प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत अकरावीची सुमारे ९१ हजार प्रवेश क्षमता असून त्यासाठी सुमारे ७८ हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदाही रिक्त जागांचा आकडा मोठा असेल. पहिल्या दोन फेºयांमध्ये हे चित्र ठळकपणे दिसून आले आहे.पहिल्या फेरीत १४ हजार ६७२, तर दुसºया फेरीत १० हजार ५३१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे घेतलेले प्रवेश रद्दही केले आहेत. या दोन फेºयांअखेर सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत प्रवेश घेतला आहे. तर, कोट्यातील प्रवेशासह हा आकडा सुमारे ४७ हजार एवढा आहे. तिसºया फेरीसाठी १४ हजार ३९२ विद्यार्थ्यांची निवड झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेश घेणारे विद्यार्थी पहिल्या दोन्ही फेºयांप्रमाणे कमी असतील. त्यामुळे या फेरीअखेरीस ५५ ते ६० टक्केच प्रवेश होतील, अशी शक्यता आहे. समितीने या वर्षीपासून पसंतीक्रमांक २ ते १० नुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीतही पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे अनेक विद्यार्थी निवड होऊनही प्रवेश घेण्याचे टाळत आहेत. चांगले महाविद्यालय मिळेल, या आशेने ते पुढील फेरीत सहभागी होत आहेत. परिणामी, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप ५० टक्केहीप्रवेश झालेले नाहीत. विद्यार्थ्यांकडून प्रामुख्याने शहराच्या मध्य भागातील महाविद्यालयांना पसंती मिळत आहे. त्यामुळे उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची टक्केवारी कमी दिसत आहे.कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची एकूण ६४० प्रवेश क्षमता आहे. पहिल्या दोन फेºयांपर्यंत इनहाऊस कोट्यासह २८० प्रवेश झाले आहेत. मागील वर्षीपर्यंत दोन फेºयांमध्ये किमान ४०० प्रवेश होत होते. उपनगरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. पुढील फेरीत प्रवेश होतील, असे समितीकडून सांगितले जात आहे.- संजय सोमवंशी, प्राचार्यगेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय