शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 8:29 PM

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

पुणे : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पण आता केवळ दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करुन सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महामंडळांवर तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारकडून खंडीत करणार असल्याची चर्चा आहे. परंतु कायद्यानुसार या नियुक्त्या देण्यात येत असून, सरकार बदलले म्हणून नियुक्त्या रद्द करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तसे केल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.

रिपाइच्या (आठवले ) राज्य कार्यकारीणीची बैठक रविवारी पुण्यात अल्पबचत भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बाेलत हाेते. आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठाच प्रश्न आहे.     

दरम्यान केंद्र शासनाने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. सध्या विधेयकाच्या गैरसमजुतीतून आंदोलने सुरु असून, काँगेस्र मुस्लिम लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही, विधेयक पारित होत असताना अमित शहा यांनी देशातील मुस्लिमांना यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन करणे थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाहीएल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते, हे पुढे आले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारवाई व्हावी. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यास त्यांचे कल्याणच होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे  सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी