शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मी नशीबवान..! पडलो तरी आमदार, सभापती झालो - राम शिंदेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:28 IST

ज्या पदावर जातो त्या पदासाठी आपण कशा पद्धतीचे योगदान देतो हे महत्त्वाचे

इंदापूर : जनता जनार्दनाचे आशीर्वाद व भाजपच्या पाठबळामुळे विधान परिषदेचे सभापती या नात्याने माझ्या राजकीय जीवनाच्या सर्वोच्च पदावर गेलो आहे. आपण ज्या पदावर जातो त्या पदासाठी आपण कशा पद्धतीचे योगदान देतो हे महत्त्वाचे आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यानी व्यक्त केले.विधान परिषदेच्या सभापती पदावर प्रा. राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल इंदापूरकरांच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी हॉलमध्ये सत्कार झाला. प्रा. राम शिंदे म्हणाले की, विधान परिषद हे वरिष्ठ व ज्येष्ठांचे सभागृह आहे. माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदा सभापती पद मिळाले आहे. कार्यकाळ संपण्यास एक दिवस कमी असताना हे पद माझ्याकडे आले. मी तर भाजपचा नसतो तर सभापती झालो असता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडून आलेल्या २४० मधील ४२ मंत्री आहेत. १९८ आमदार आहेत व मी सभापती आहे. लोक म्हणतात राम शिंदे नशीबवान आहेत.मी तर नशीबवान आहेच, पडलो तर आमदार झालो दुसऱ्यांदा सभापती झालो, असे ते म्हणाले. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जी माणसं खडतर प्रवास करतात त्यांचे यश मोठे असते. प्रा. शिंदे कष्टाची सवय असणारे भाजपचे फार मोठे नेते आहेत. भाजपने त्यांना खूप मोठे पद दिले आहे. या पदाचा उपयोग ते निश्चितपणे जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी करतील. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माउली चवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शशिकांत तरंगे, माउली वाघमोडे, शिवाजीराव मखरे, तेजस देवकाते यांची भाषणे झाली. किरण गानबोटे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRam Shindeराम शिंदेBJPभाजपा