शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: गॅस सिलिंडरनंतर आता खाद्यतेलाच्या दरात वाढ; महागाईने कोलमडले गृहिणींचे बजेट

By अजित घस्ते | Updated: March 17, 2026 09:42 IST

- जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि आयातीवरील शुल्कात दरवाढ झाल्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.

पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतीयांना बसला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात व्यावसायिक सिलिंडर गॅस कंपन्यांनी वितरण व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. तर घरगुती गॅस टंचाई भासत असल्याने नागरिकांच्या गॅस सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत. त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यातच आता खाद्यतेलाच्या किमती प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी वाढल्या आहेत. पुण्याच्या मार्केटयार्डासह किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने १५ लिटर तेलाच्या डब्याच्या किमतीत १०० ते १५० रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे स्वंयपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

खाद्यतेलाच्या दराचा उडाला भडका

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि आयातीवरील शुल्कात दरवाढ झाल्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलाच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत लिटरमागे १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर १५ लिटरच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांनी महाग झाला आहे. मागील आठवड्यात तेलाचा १५ लिटरचा डबा हा २२०० ते २३०० रुपयांना मिळत होता. आता १५ लिटरच्या तेलाच्या डब्यासाठी २४०० ते २५०० रुपये मोजावे लागत आहेत.

असे आहेत खाद्यतेलाचे दर

तेलाचा प्रकार - जुना दर (प्रतिलिटर) - नवा दर (प्रतिलिटर)

सोयाबीन तेल  - १४० ते १४५-   १५५ ते १६०

सूर्यफूल तेल  - १४५ ते १५५ -   १६६ ते १७०

पामतेल -११५ ते १२५ - १४५ ते १५०

शेंगदाणा तेल - १८० ते १९०  -  २०० ते २२०

- हॉटेल व्यावसायिकांचेही दणाणले धाबे

केवळ घरगुती वापरासाठीच नव्हे, तर पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. वडापाव, भजी आणि इतर तळलेल्या पदार्थांच्या किमतीही यामुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चहाचा दर १० रुपयांवरून १२ रुपये, तर वडपाव २० ते २५ रुपयांवर गेला आहे. हॉटेलमधील खाद्यवस्तू कमी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे, तर दुसरीकडे या महागाईच्या काळात घरखर्च कसा भागवायचा? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

गुडीपाढवा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेलाच्या किमती वाढणे ही चिंतेची बाब आहे. गॅस आणि तेल या दोन्ही जीवनावश्यक वस्तू महागल्याने महिन्याचे नियोजन करणे कठीण झाले आहे. - आरती अष्टूळ, गृहिणी, संतनगर   

पुण्याच्या मार्केटयार्डात सध्या मालाची आवक स्थिर असली तरी साठवणूक आणि वाहतूक खर्च वाढल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना किलोमागे १० ते १५ रुपये जादा पैसे मोजावे लागत आहेत. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत दर चढतेच राहण्याची शक्यता बाजारात वर्तविली जात आहे. - रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी

गॅस आणि तेल या दोन्ही जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात गॅस सिलिंडर टंचाई भासत आहे. त्यातच गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महाग झाला आहे. तर आज किराणा दुकानात तेलाची खरेदी करण्यासाठी गेली असताना तेलाच्या दरातही प्रतिलिटर मागे १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सूर्यफूल तेल १८० रुपयांना एक लिटर मिळत आहे. यामुळे अशा परस्थितीत आम्ही जगायचे तरी कसे? असा मोठा प्रश्न आहे.  - स्वाती शिर्के, गृहिणी 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चा माल आणि समुद्रामार्गे होणारी वाहतूक यामुळे दरात वाढ झाली आहे. पूर्वी जुन्या डब्यातून तेल येत होते. आता नवा डबा आल्याने त्यात ५० ते ६० रुपयांनी दर वाढलेले आहेत. तर १५ किलोंच्या तेलाच्या डब्यात १०० ते १२५ रुपयांची वाढ डब्यामागे झाली आहे. नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. तेलाचा मुबलक साठा उपलब्ध आहे.  - सतवीर गोयल, तेल व्यापारी, मार्केटयार्ड

English
हिंदी सारांश
Web Title : Cooking oil prices surge after gas; household budgets strained.

Web Summary : War and increased import duties have spiked cooking oil prices, burdening households already struggling with gas cylinder costs. Prices have risen by ₹15-25 per liter, impacting home cooks and businesses alike. Traders cite stable supply, but increased storage and transport costs.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढ