६०० किमी चालत आलेल्या शेतकऱ्याची निष्ठा सफळ;शरद पवारांनी भेटीसाठी दिला तब्बल दीड तास वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 07:05 PM2020-12-16T19:05:42+5:302020-12-16T19:15:40+5:30

घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवार साहेबांचा फोटो आहे असे सांगत त्यांनी त्यांची पवारांवरील निष्ठा अधोरेखित केली.

... The loyalty of the farmer who walked 600 km is successful; Appointment time given by Sharad Pawar | ६०० किमी चालत आलेल्या शेतकऱ्याची निष्ठा सफळ;शरद पवारांनी भेटीसाठी दिला तब्बल दीड तास वेळ

६०० किमी चालत आलेल्या शेतकऱ्याची निष्ठा सफळ;शरद पवारांनी भेटीसाठी दिला तब्बल दीड तास वेळ

Next

प्रशांत ननावरे -

बारामती:  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक समर्थक आहेत. पवारांवरील निष्ठा,प्रेम वेळोवेळी त्यांचे खंदे समर्थक वेगवेगळ्या
मार्गाने व्यक्त करतात. नुकताच पार पडलेल्या  त्यांच्या ८० वा वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात
आल्या. मात्र, ६०० किमी अंतरावरुन शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत आलेला शेतकरी यावेळी चर्चेचा विषय ठरला. याबाबत माहिती समजल्यानंतर  पवार यांनी त्याला भेटीचे आमंत्रण देत त्या शेतकऱ्याबरोबर दिड तास वेळ देत त्याच्या निष्ठेचा सन्मान केला. हाच सन्मान आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

संजय खंदार देशमुख (रा.जवळा,ता.अरणी,जि.यवतमाळ) असे या ज्येष्ठ शेतकऱ्याचे नाव आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे हे गाव आहे. देशमुख  यांच्यानंतर बळीराजासाठी महत्वाचे निर्णय शरद पवार यांनीच घेतले.त्यांनी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे देशमुख यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल झाला.त्यामुळे पवार यांच्याविषयी शेतकरी देशमुख यांच्या मनात अढळ स्थान निर्माण झाले.त्यामुळे  यंदाच्या वाढदिवशी   शरद पवारांना भेटायचच, हे मनाशी पक्क ठरवून ते जवळा गावातून थेट चालत बारामतीच्या दिशेने निघाले. तीव्र इच्छाशक्तीमुळे वयाच्या ५४ व्या वर्षी  देशमुख हे तब्बल ११ दिवस जवळपास ६३० कि.मी.चे अंतर चालून ११ डिसेंबरला बारामतीत पोहोचले.

या दिवशी पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी उपस्थित नव्हते.त्यामुळे शेतकरी देशमुख पवारांच्या मूळ गावी काटेवाडीत पोहचले.गावकरी देशमुख यांची निष्ठा पाहुन भारावले.त्यांनी  देशमुख यांचा मोठा सन्मान केला.यावेळी शेतकरी देशमुख यांची पवार यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा काटेवाडी येथे वास्तव्यास असणारे   संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांना सांगितली. त्यानंतर काटे यांनी थेट पवार यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. पवार यांनी देखील शेतकरी देशमुख यांच्या निष्ठेचा मान राखत भेटीची वेळ दिली.पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी काटे यांना संपर्क साधत पुणे शहरातील मोदी बागेतील निवासस्थानी वेळ दिल्याचे सांगितले.

त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष प्रविण गायकवाड,काटे शेतकरी देशमुख यांना घेवुन मोदीबागेतील पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी(दि १५) पोहचले. यावेळी पवार यांनी शेतकरी देशमुख यांना तब्बल दीड तासांचा वेळ दिला. त्यांची आस्थेने चौकशी केली. पवार यांच्या भेटीने
भारावलेल्या देशमुखांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिले. या भेटीने आयुष्याचे सार्थक झाले. घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवार साहेबांचा
फोटो आहे असे सांगत त्यांनी त्यांची पवारांवरील निष्ठा अधोरेखित केली.पवार यांनी देखील त्यांच्या निष्ठेचा सन्मान केल्याने देशमुखांची ६०० किमीचा प्रवास खऱ्या अर्थाने सार्थक ठरला.

Web Title: ... The loyalty of the farmer who walked 600 km is successful; Appointment time given by Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.