शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निष्ठावंतांवर येणार संक्रांत..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:14 IST

पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश असल्याचा सूर या बैठकीत आळवला गेला..

ठळक मुद्देकाहीजणांकडून माहिती घेतली असता बहुतेकजण बैठकीवर नाराज

पुणे: पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश आहे. कारण काँग्रेसमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवारीवरुन प्रचंड मतभेद, गटबाजी आहे. परंतु, पक्षाला त्याचा काडीमात्र उपयोग नाही. तसेच लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत अचानक इतकी नावे येतात वाढतात कशी? फार्म भरला त्यांची नावे यादीत घेतली, आता फार्म भरला नाही ते पण इच्छुक कसे झाले असा प्रश्न उपस्थित करुन नाव न घेता माजी आमदार ऊल्हास पवार यांच्यावर देखील टीका केली. तुमच्यात एकमत झाले नाहीतर अशा परिस्थितीत उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यांच्याकडून ज्या कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस इच्छुक उमेदवारांचे कान टोचले आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.२२) सकाळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीला आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे या इच्छुकांसह गांधी यांना पत्र पाठवणारे माजी आमदार ऊल्हास पवार, प्रदेश कार्यकारिणीचे संजय बालगूडे, आबा बागूल, कमल व्यवहारे, नीता रजपूत, गोपाळ तिवारी, आदी उपस्थित होते. सुरूवातीला सर्वांबरोबर एकत्रित संवाद करण्यात आला. त्यात तूम्ही इथे तूमचे एकमत केले पाहिजे, सीट जिंकणे सोपे नाही, पण एकत्र राहणे गरजेचे आहे. तसे दिसत नाही.त्यानंतर दोन्ही नेत्यांनी वैयक्तिकपणे प्रत्येकाशी चर्चा केली. यात मराठा उमेदवार दिला तर काय, अन्य उमेदवार दिला तर काय, तूमची पसंती कोणाला, स्थानिक उमेदवार चालेल का, सध्याची स्थिती काय आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्यातही एकमत होत नसेल तर पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार मान्य करावा लागेल असेच सांगण्यात आले .पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश असल्याचा सूर या बैठकीत आळवला गेला. बैठकीत सहभागी झालेल्या इच्छुक उमेदवारांचा कानोसा घेतला असता हे चित्र पाहायला मिळाले. तुमच्यात एकमत होत नाही तर पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराचे काम करावे लागेल असे नेत्यांनी वैयक्तिक व सामूहिक रित्याही बजावले असल्याचे समजते. ...............काहीजणांकडून माहिती घेतली असता बहुतेकजण बैठकीवर नाराज असल्याचे दिसले. शहर शाखेने पाच नावे पाठवली, त्यातील तीन नावे प्रदेशने फायनल केली, आता ती केंद्रीय समितीकडे पाठवण्याचे सोडून ही बैठक कशासाठी घेतली तेच समजत नाही असेच त्यांचे म्हणणे आहे. उमेदवार आयात करण्याचे पक्के झाले आहे. स्थानिकांची मानसिकता तयार करण्यासाठीच ही बैठक घेतली गेली. आता एकतर जातीय विचारांची पार्श्वभूमी असलेल्यांचा किंवा मग पैसेवाल्यांचा प्रचार करावा लागणार असा त्रागाही काहींनी व्यक्त केला.--- आमदार अनंत गाडगीळ यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने पाटील व चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना उमेदवारी देणे पक्षासाठी कसे उपयोगी आहे ते सांगितले असल्याची माहिती मिळाली. गाडगीळ बैठकीला आलेच नाहीत. मात्र, ते लोकसभेसाठी इच्छुक असून आमदार म्हणून काय कामे केली याचे बोर्ड त्यांनी पुण्यातील काही चौकांमध्ये लावले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूक