प्रेयसीचे WhatsApp चॅटिंग पाहून प्रियकराची सटकली, भर रस्त्यात केली धुलाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:21 IST2022-08-10T13:17:59+5:302022-08-10T13:21:46+5:30

23 वर्षीय प्रेयसीची तक्रार, गुन्हा दाखल...

Lover got upset after seeing his girlfriend's Whatsapp chat beating on the road in pune | प्रेयसीचे WhatsApp चॅटिंग पाहून प्रियकराची सटकली, भर रस्त्यात केली धुलाई...

प्रेयसीचे WhatsApp चॅटिंग पाहून प्रियकराची सटकली, भर रस्त्यात केली धुलाई...

- किरण शिंदे

पुणे: प्रेयसीच्या मोबाईल तपासत असताना त्यात तिने एका व्यक्तीसोबत केलेले चॅटिंग पाहून प्रियकराची चांगलीच सटकली. आणि त्याने रागाच्या भरात प्रेयसीची धुलाई केली. यानंतर संतापलेल्या प्रेयसीनेही थेट पोलीस स्टेशन गाठत प्रियकराविरोधात तक्रार दिली. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रियकराविरुद्ध भादवी 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील एका सार्वजनिक रस्त्यावर घडला. 23 वर्षीय प्रेयसीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे चांगले मित्र होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. दरम्यान सोमवारी फिर्यादी तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी मार्केटयार्ड परिसरात गेली होती. एके ठिकाणी दोघे गप्पा मारत थांबले होते. याचवेळी प्रियकराने प्रेयसीचा मोबाईल घेतला आणि व्हाट्सअप चॅटिंग तपासू लागला. यावेळी त्याने फिर्यादीने बहिणीसोबत केलेले चॅटिंग पाहिले. परंतु हे चॅटिंग मुलासोबत केले असावे असा संशय त्याला आला आणि याच रागातून त्याने प्रेयसीला भर रस्त्यात मारहाण करत शिवीगाळ केली. 

दरम्यान भर रस्त्यात प्रियकराने मारहाण केल्यानंतर प्रेयसी देखील संतापली. तिने तडक पोलिस स्टेशन गाठले आणि प्रियकराविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता मार्केटयार्ड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Lover got upset after seeing his girlfriend's Whatsapp chat beating on the road in pune