शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना

By निलेश राऊत | Published: April 05, 2024 8:38 PM

लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते असं त्यांनी म्हटलं.

पुणे - एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाची हानी ही होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेले त्यामुळे शिवसेनेची हानी होईल. असे प्रतिपादन करून, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढळराव हे ताटातून वाटीत गेले असल्याची टिप्पणी केली. 

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते. युतीमध्ये यापूर्वी ही तडजोडी झाल्या आहेत. महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतील. सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत.  भाजपने आमचे उमेदवार बदलले असे पर्सेप्शन तयार केले आहे, पण अशा प्रकारे गैरसमज पसरवणे योग्य नाही. यापूर्वीही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे. होती. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरुप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आधीपासून असे आडाखे बांधणे योग्य नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आरोप केले नाहीत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्यातील लढत दुहेरीचवंचित कडून वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणुकीत उतरल्याने पुण्यातील लढत तिरंगी होणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी, गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचितचा पहिल्या पहिल्यांदा जोर असतो. पण मतदानावेळी तो कमी होतो. त्यामुळे पुण्याची निवडणुक ही मोहोळ व धंगेकर अशी दुहेरीच होईल असे सांगितले. दरम्यान अजित पवार यांचे पूर्ण जिल्ह्यातील काम पाहता बारामती मध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी बारामती लोकसभा मतदार संघात मेळावे घेतले आहेत, जिथं जिथं माझी गरज असेल, तिथं तिथं मी प्रचाराला जाईल असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती असले तरी ते लोकशाहीचे छत्रपती आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे आपल्याला आणि छत्रपती यांना मतदानाच्या एकच अधिकार आहे. तिकीट न मिळाल्याने  उदयन राजे यांचा सन्मान कमी होईल असे समजण्याचे कारण नसल्याचे ही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती