शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो

By admin | Updated: May 18, 2015 23:08 IST

बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिला होता.

बारामती : बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिला होता. परंतु, नगरपालिकेच्या सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात शिक्षकांच्या पगाराच्या संभाव्य खर्चाची तरतूद नसल्याने यंदा नगरपालिकेच्या शाळेत इंग्रजी शिक्षण मिळण्याची शक्यताच संपुष्टात आली आहे. नगरपालिका शिक्षण मंडळाच्या आजच्या सभेत नर्सरी ते एचकेजी आणि ८वी ते १०वी चे माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचा विषय घेण्यात आला होता. नगरपालिकेला शिक्षण मंडळाने यापूर्वीच या संदर्भात प्रस्ताव दिला होता. परंतु, २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात इंग्रजी माध्यमाच्या शाळा, माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाच्या बाबत संभाव्य खर्चाची तरतूद करण्यात आलेली नाही. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात तशी तरतूद करण्यात येईल. मात्र, ८वी ते १० वीचे वर्ग सुरू करण्यासाठी सध्या शिक्षण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या शिक्षकांमधूनच कार्यवाही करावी, असा ठराव करण्यात आल्याचे पत्र मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी शिक्षण मंडळाला दिले आहे. शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी २०१४ पासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करणे, ८वी ते १०वी माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी नगरपालिकेला प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आर्थिक तरतूद करावी, असे कळविले होते. आज झालेल्या बैठकीत नगरपालिकेने दिलेल्या पत्राची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्पात तरतूद नसल्यामुळे यंदा तरी इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. या संदर्भात शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आमदार अजित पवार यांना भेटणार आहेत. हे वर्ग सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, याची मागणी ते करणार आहेत. अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक : झिंजाड४या संदर्भात मुख्याधिकारी दीपक झिंजाड म्हणाले, इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी येणाऱ्या खर्चाला आर्थिक तरतूद अंदाजपत्रकात करणे आवश्यक आहे. मात्र, ८वी ते १०वी च्या माध्यमिक शाळांचे वर्ग उपलब्ध शिक्षकांच्या माध्यमातून करणे शक्य आहे. तिन्ही वर्ग एकदाच सुरू होणार नाहीत. ८वीचा वर्ग यंदा सुरू होईल. नैसर्गिक वाढीनंतर ९वी, १०वीचे वर्ग सुरू होतील. त्यानुसार अंदाजपत्रकात २०१६-१७ ला तरतूद करणे शक्य होईल. ४नगरपालिकेच्या शाळांमध्ये साधारणत: गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शैक्षणिक शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थी इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहतो. या कारणास्तव शिक्षण मंडळाचे सभापती माधव जोशी, उपसभापती पराग साळवी व सदस्यांनी पाठपुरावा केला आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पातच तरतूद न केल्यामुळे यंदा इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.