नीरा-मोरगावदरम्यान चालता ट्रक लुटला; बीअरचे बॉक्स पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 21:00 IST2023-08-30T20:57:42+5:302023-08-30T21:00:25+5:30
बुधवारी पहाटे नीरा शहरापासून मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुळुंचे हद्दीत चालता ट्रक लुटल्याची घटना घडली...

नीरा-मोरगावदरम्यान चालता ट्रक लुटला; बीअरचे बॉक्स पळवले
नीरा (पुणे) : दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्याचा जवळचा व खुश्कीच्या मार्ग असलेल्या सातारा - नगर रस्त्यावर लुटमारीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पहाटे नीरा शहरापासून मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुळुंचे हद्दीत चालता ट्रक लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी बीअरचे ५ बॉक्स लंपास केले आहेत.
पुरंदर तालुक्याच्या गुळुंचे गावाच्या हद्दीत औरंगाबादहून साताराच्या दिशेने निघालेला ट्रक (क्र. एम.एच ११ डी.डी २२८६) हा बीअर घेऊन निघाला असता. गुळुंचे-चौधरवाडीदरम्यान रात्री अडीच वाजेच्या सुसारास चोरट्यांनी चालत्या गाडीतून बीअरचे ५ बॉक्स लांबवले. घटना घडल्याच्या ठिकाणी रस्ता कच्चा आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. या मंदावलेल्या वेगाचा फायदा दबा धरून बसलेले चोरटे घेतात. या महिन्यात चोरी होण्याची ही तिसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास नीरा पोलिस करत आहेत.