शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

पंतप्रधान मोदींकडे बघा,दिवसातले २२ तास ते काम करतात : चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर'निशाणा'  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 8:41 PM

पंतप्रधानांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत...

ठळक मुद्देभाजपच्या 'या' कार्यक्रमात फिजिकल डिस्टनसचे वाजले तीन तेरा.. 

पुणे : पुणेकरांचा स्वभाव आणि त्यांच्या सवयी यावरून त्यांची वेगळीच ओळख आहे. त्यात दुपारी १ ते ४ या वेळेत वामकुशी घेण्याची बऱ्याच पुणेकरांच्या सवयीचा भाग आहे.  त्यावरून बरीच टीका टिपण्णी देखील होत असते. पण आता याच कार्यपद्धतीवर बोट ठेवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ''पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघा ते दिवसभरातले अक्षरश: २२- २२ तास काम करतात'' अशा शब्दात पुणेकरांवर 'उपदेशात्मक निशाणा' साधला आहे. 

पिंपळे सौदागर येथे भाजपा आमदारांचा कौतुक सोहळा शनिवारी (दि.२४ ) पार पडला.या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी उपस्थित भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपाचे दीडशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पंतप्रधानांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहे. ते विरोधकांकडून होणाऱ्या टीकेची कदापि चिंता करत नाही व त्याला प्रत्युत्तर सुद्धा देत बसत नाही. मोदी कधीही टीकेने विचलित होत नाही. ते फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात. त्यांच्यावर झालेल्या कितीही टोकाच्या टीकेला ते संयमाने सामोरे जातात.कितीतरी वर्षांनी देशाला आणि जगाला असे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून सुद्धा काही जणांनी टीका केली होती. परंतु मोदींनी त्यावर कोणतेही आक्रमकपणे भाष्य न करता प्रत्यक्ष उपस्थित राहत तो भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. 

पाटील यांनी सांगितले, निवडणुकीत जनतेने तुम्हाला दिलेला विजय हा त्यांचे कामे, प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे. त्या उद्देशाला व त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देता कामा नये. अन्यथा पाच- सहा वेळेस आमदारकी पदरी पडून देखील काहीच उपयोग नाही. आयुष्यात नेहमी आपले लक्ष निश्चित करायला हवे . त्याचप्रमाणे सर्वानी आपल्याला रात्री झोपताना दिवसभरात कोणती चुकीची गोष्ट केली नाही ना हा प्रश्न विचारून याचे समाधानकारक उत्तरासाठी कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे. 

भाजपच्या 'या' कार्यक्रमात फिजिकल डिस्टनसचे वाजले तीन तेरा.. नेहमी शिस्तप्रियतेचे दर्शन घडविणाऱ्या भाजपाकडून या कार्यक्रमात पन्नासपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणे, मास्क न परिधान करणे, फिजिकल डिस्टनसचे तीन तेरा वाजले होते. व्यापीठावरील काही नेते मास्कविनाच बसले होते. कोरोनाचे नेते आणि कार्यकर्ते यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले...................पोलीस आयुक्त कारवाई करणार?भाजपाच्या कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्स, जमावबंदी, मास्क न वापरणे या कोरोना कालखंडातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. नवनियुक्त डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश भाजपावर कारवाई करणार का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे......................त्यांचे दणाणले धाबे  दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुष्काळ पाहणी दौºयात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी कार्यक्रम सुरू असतानाच धडकली. त्यावेळी पाटील यांच्या संपर्कात अनेक कार्यकर्ते आणि नेते आले होते. त्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :pimpale saudagarपिंपळे सौदागरchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा