लोणी काळभोर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; २३ ब्रास वाळू व ६ ट्रक असा एकूण ३५ लाख ८४ हजार हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:38 PM2020-10-12T19:38:28+5:302020-10-12T19:39:17+5:30

चालक व मालकांसहित त्यांना मदत करणारे अशा एकूण ६ जणांना अटक

Loni Kalbhor Police in 'Action Mode'; Trucks and sand worth Rs 35 lakh 84 thousand were seized | लोणी काळभोर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; २३ ब्रास वाळू व ६ ट्रक असा एकूण ३५ लाख ८४ हजार हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

लोणी काळभोर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; २३ ब्रास वाळू व ६ ट्रक असा एकूण ३५ लाख ८४ हजार हजारांचा मुद्देमाल ताब्यात 

Next

लोणी काळभोर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; ६ ट्रक व वाळू असा एकूण ३५ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात 
लोणी काळभोर : लोणी पोलिसांनी शिंदवणे ( ता हवेली ) येथे सुरू असलेल्या वाळू वॉशिंग सेंटरवर छापा घालून दोन तर महामार्गावरून वाहतूक करताना सापडलेले ६ ट्रक व वाळू असा एकूण ३५ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या गाडी चालक व मालकांसहित त्यांना मदत करणारे अशा एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शिंदवणे येेेथे पोपट देवराम महाडिक व अविनाश मोहन महाडिक दोघे रा. शिदवणे ता. हवेली ), अभिजित ऊर्फ महावीर श्रीमंत काकडे ( वय ३५, रा. उरूळी कांचन, ता हवेली ) तर सोलापूर - पुणे महामार्गावर लोणी काळभोर कॉर्नर येथे गणेश विठ्ठल गायकवाड ( वय ३९, रा. सिद्धटेक गणपती, ता. कर्जत ), परमेश्वर अंकुश सरडे ( वय ३८, रा. भांडगांव, ता. दौंड ), पप्पू धोंडीराम राठोड ( वय २५, रा. गिरीम, ता. दौड ) व मुकुंद पंडीत डोईफोडे ( वय २६, रा. आंबेगांव बुद्रुक, ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे. 

      सोमवारी ( १२ ऑक्टोबर ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास केली आहे. उरूळी कांचन पोलीस दुरक्षेत्राचेे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस हवालदार संदिप पवार, होमगार्ड डी एम वीर व जे. बी. जंगले हे रात्रगस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत शिदवणे वळती रोडलगत खडी मशीन जवळ पोपट देवराम महाडिक ( रा. शिदवणे ता हवेली ),  हे अनाधिकृतपणे अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रकमधील वाळू धुुुवूून ट्रकचालक व मालक यांना वाहतुक करण्यास मदत करत आहेत अशी खात्रीशीर मिळाली. याठिकाणी जाऊन पोलीस पथकाने अचानक छापा घातला.  त्यावेळी तेथे (एमएच १२ एलटी ८७८८ व एमएच १२ एचडी ७५८३ ) हे ट्रक मिळून आले. ट्रकमध्ये असलेली ७ ब्रास वाळू व ट्रक असा एकूण १४ लाख ५६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर पहाटे २ ते ५ या कालावधीत पोलीस निरीक्षक गणेश ऊगले, पोलीस हवालदार संतोष शिंदे, परशुराम सांगळे, रणमोडे व गाले हे रात्रगस्त घालत असताना त्यांना सोलापूर - पुणे महामार्गावर लोणी काळभोर कॉर्नर येथे ट्रक (एमएच १२ केपी ००४६)व टाटा एलपी ट्रक (एमएच ४२ टी १८८१), टाटा हायवा ट्रक( एमएच १२ एफ ३८५५ व टाटा एस ट्रक  एमएच ४२ टी ०४८२ या बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून अनधिकृतपणे वहातूक करत असताना मिळून आल्या. सर्व ट्रक चालक व मालकांना वाळूच्या रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. या ४ ट्रकमध्ये एकुण १६ ब्रास वाळू होती. या ट्रक व वाळूची किंमत एकुण २१ लाख २८ हजार रुपये अशी दोन्ही ठिकाणची २३ ब्रास वाळू व ६ ट्रक असा एकूण एकूण ३५ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

           या अवैध वाळू धुण्याच्या व्यवसायासाठी डिझेल इंजिनचा वापर करून विद्यूत पंपाच्या सहाय्याने ओढ्यातील पाणी उपसा सुरू केला जातो. त्यामुळे ओढ्यातील पाण्यात डिझेल व ऑईलचा थर जमा होत आहे. या उद्योगामुळे आसपासच्या गावांतील रस्त्याची चाळण झाली असून मोठ मोठे खड्डे रस्त्यावर पडले असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाळू धुण्यासाठी पुर्व हवेेेलीतील ओढयांचा वापर होत असून प्रत्येक वाहनांमागे ठराविक रक्कम मिळत असल्याने या ठिकाणी वाळू धुण्यासाठी वाळू ट्रक वाहनांची अहोरात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. 

Web Title: Loni Kalbhor Police in 'Action Mode'; Trucks and sand worth Rs 35 lakh 84 thousand were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.