Pune Crime: गाडी बाजूला काढ म्हटल्यावर 'त्याने' केला कोयत्याने वार; लोणी काळभोरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:44 PM2022-01-22T14:44:23+5:302022-01-22T15:22:05+5:30

दुचाकी बाजुला न करता दादागिरीची भाषा सुरु केली....

loni kalbhor crime incidents attack on man with knife pune crime news | Pune Crime: गाडी बाजूला काढ म्हटल्यावर 'त्याने' केला कोयत्याने वार; लोणी काळभोरमधील घटना

Pune Crime: गाडी बाजूला काढ म्हटल्यावर 'त्याने' केला कोयत्याने वार; लोणी काळभोरमधील घटना

googlenewsNext

लोणी काळभोर : वडिलांच्या दशक्रियाविधीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी चारचाकीमध्ये निघालेल्या माजी सैनिकाने रस्त्यावर असलेली दुचाकी बाजूस काढण्यास सांगितली. याचा राग आल्याने १५ ते १७ जणांनी ७ जणांवर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय ३०, रा. माळीमळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश भोसले, अभिजीत उर्फ दिगंबर पवार, ओम लिंगरे, साहिल बारसकर, गौरव धांदे, ॠषिकेश पाटोळे, सोन्या गायकवाड, अमित सोनवणे, विशाल आण्णासाहेब जाधव, राम म्हस्के, ओंकार जोगदंड व इतरांचे विरोधात दहशत निर्माण करीत कोयते उंचाविणे, कोयते मारण्याचे भय दाखविणे, जिवे ठार मारण्याच्या उददेशाने कोयता हत्यारांनी मारहाण करुन जखमी करणे या कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास जगताप याचे वडिलांचा दशक्रिया विधी २२ जानेवारी रोजी असल्याने २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस त्यांचे लहान बंधू निवृत्त सैनिक अक्षय हे आई उषा हिस घेऊन दशक्रिया विधीकरिता लागणारे सामान आणण्याकरीता चारचाकीतून लोणी काळभोर गावात निघाले होते. त्यावेळी तेथे राहणारे गणेश भोसले व अभिजीत (पुर्ण नांव माहित नाही) यांनी रस्त्यात त्यांची ज्यपिटर मोपेड उभी केली होती. त्यांना काढण्यास सांगितली असता, त्यांनी मुददाम भांडण उकरून काढण्याच्या व दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने पार्क केलेली मोपेड रस्त्यात पुर्णपणे आडवी लावून रस्ता अडविला.

दुचाकी बाजुला न करता दादागिरीची भाषा सुरु केली. शिवीगाळ करत  मारुन टाकेन. माझ्यावर ऑलरेडी हापमर्डर व मर्डरच्या केसेस आहेत असे म्हणून मोबाईल वरुन फोन लावत अमित पोरं घेऊन ये. इथं दोघा तिघांना कोयतेच टाकू असे म्हणून त्याने अक्षय व श्रीनिवास यांचेशी हाताने झटापटी केल्या. आई मध्ये पडल्याने, तिच्या अंगावर धावून जाऊन तिलाही मारहाण केली. त्यानंतर ते मोपेड चालु करुन निघून गेले.

Web Title: loni kalbhor crime incidents attack on man with knife pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.