शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Lokmat Women Summit 2018 : पुरुषीवर्चस्वाला आव्हान द्यावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 5:51 PM

सक्षम व ठामपणे उभे राहण्यासाठी स्त्रीला पुरुषीपणाचे आव्हान मोडून काढावे लागेल. असा सूर लोकमत वुमन समिट च्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. 

 पुणे - स्त्रियांना आतापर्यतच्या प्रवासात खूप काही गमवावे लागले. तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. दरवेळी मान अपमान, दुःख, उणेपणाची भावना तिला कायम उराशी बाळगावी लागली. यासगळ्यात तिच्या मनाला पुरूषीपनाचा डंख बसत गेल्याने तिच्यातील सर्जनशिलतेला पुरेसा न्याय मिळाला नाही. यापुढेही सक्षम व ठामपणे उभे राहण्यासाठी तिला पुरुषीपणाचे आव्हान मोडून काढावे लागेल. असा सूर लोकमत विमेन समिट २०१८ च्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला. 

या परिसंवादात मादागास्करचे भारतातील राजदूत मरी लिओनतिनी रझांद्रोसा, पद्मश्री सुधा वर्गीस, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे, राष्ट्रीय महिला आयोयाच्या रेखा शर्मा, मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, रुपाली देशमुख उपस्थित होत्या. आफ्रिकेत देखील सर्व काही आलबेल आहे असे नाही. खासकरून मादागास्कर मध्ये देखील स्त्री पुरुष भेद पाहवयास मिळतो. माहिती आणि तंत्रज्ञानच्या युगात स्त्री ला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशी खंत मरी लिओनातीनी रंझद्रोझा यांनी व्यक्त केली. वर्गीस म्हणाल्या, सुरुवातीपासून लहान मुलांच्या शिक्षण या घटकावर लक्ष केंद्रित केले. बिहार मधील एका गावात दारुच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या लोकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी नव्हती. स्वीडन आणि स्टोकहोम मध्ये देखील पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पाणी वाचविण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त पुढाकार घेत असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. तर छाब्रिया यांनी समाजात स्त्री पुरुष समानता आणायची असल्यास त्याची सुरुवात शिक्षणापासून हवी असे सांगितले. अद्याप आपल्याकडे स्त्री पुरुष भेद, स्त्रीयांकडे सामाजिक दृष्टीने पाहण्याची भावना हे बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८Maharashtraमहाराष्ट्रWomenमहिला