शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

‘लोकमत’ने योगसंस्कृती नेली विश्वस्तरावर; कॅम्पस क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त योगदिनी साकारला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:21 IST

महाराष्ट्रातील पाच शहरांत मिळून १ हजार ५९६ मुलांनी एकाच वेळी भुजंगासन (योग) करत पुन्हा एकदा विश्वविक्रमाला गवसणी घातली.

पुणे : लोकमत कॅम्पस क्लबच्या रौप्यमहोत्सवानिमित्त लोकमत कॅम्पस क्लब प्रस्तुत महाराष्ट्रातील पाच शहरांत मिळून १ हजार ५९६ मुलांनी एकाच वेळी भुजंगासन (योग) करत पुन्हा एकदा विश्वगर्जनेला गवसणी घातली आहे. या विश्वगर्जनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून, योग दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेला हा विश्वविक्रम योग संपन्न भारताच्या संस्कारांची एक प्रेरणादायक झलक या मुलांच्या माध्यमातून दिसून आली. 

या ऐतिहासिक दिवशी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांतील शाळांमधील मुलांनी एकाच वेळी भुजंगासन करत ‘योग’ हा आपल्या जीवनशैलीचा भाग आहे, हे जगाला दाखवून दिले. लोकमत आणि लोकमत कॅम्पस क्लब प्रस्तुत, सुहाना प्रवीण मसाले आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल प्रायोजक होते. 

यावेळी लोकमत कॅम्पस क्लब आणि लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, संपादक संजय आवटे, ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा, सीएम इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ. सागर गणपतराव बालवाडकर, गणपतराव बालवाडकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ऋषी नाथ, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मार्गदर्शक मिलिंद वेरलेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण भूषण देशपांडे, ‘लोकमत’चे राज्याचे इव्हेंट प्रमुख रमेश डेडवाल, लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई आदी उपस्थित होते. हा विश्वविक्रम पावसाच्या सरींच्या साक्षीने चिमुकल्यांनी केला. या विश्वविक्रमाला विलास जावडेकर डेव्हलपर्स, अमर बिल्डर, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्रीश्री योगा, मुक्ता ट्रेड, आशा भेळ, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, ऑक्सिरिच यांचे सहकार्य लाभले.

शिक्षणाबरोबर मुलांवर योगसंस्कार

बालवयातच शरीराची, मनाची आणि श्वासाची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाने लहानग्यांच्या मनात एक वेगळेच समाधान आणि आत्मविश्वास जागवला. शरीर लवचीक ठेवणारे भुजंगासन करताना मुलांनी एकाग्रता अन् शिस्तीचा मनमुराद आनंद घेतला. सध्याची प्रत्येकाची जीवनशैली धावपळीची झाली आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकांना आजार जडतात. शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते शरीर, मन, विचार आणि संस्कृती यांचा एक सुंदर मिलाफ असावा, हेच या उपक्रमातून दर्शवणारे हे बालयोद्धे आजच्या भारताचे खरे ‘योगदूत’ ठरले.

महाराष्ट्रातील पाच शहरांत एकाच वेळी भुजंगासन (योग) करण्याचा विश्वविक्रम 

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीगनर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी एकाच वेळी लोकमत कॅम्पस क्लब, प्रवीण मसाले आणि सीएम इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून भुजंगासन (योगा) करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम करणारे ‘लोकमत’ माध्यम एकमेव असून, या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. बालेवाडी येथील छत्रपती क्रीडासंकुल येथे झालेल्या विश्वविक्रमात राज्यातील पाच शहरांतील १ हजार ५९६ मुलांनी सहभाग नोंदवला होता. 

ही केवळ एक योगासनेतील कामगिरी नव्हे, तर हा आपल्या संस्कृतीच्या पायाभूत मूल्यांची पुन्हा एकदा साक्ष देणारा विश्वविक्रम आहे. चिमुकल्यांनी एकाच वेळी भुजंगासन करत नवा इतिहास घडवला, हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शिस्तीचे उत्तम उदाहरण आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून हा विश्वविक्रम घडला आणि याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद  घेतली, हेदेखील महत्त्वाचे. -विशाल चोरडिया (संचालक, मार्केटिंग अँड स्ट्रॅटेजी, प्रवीण मसाले) 

कोरोनाकाळापासून मुलांना मोबाइल आणि स्क्रीनची फार सवय लागली आहे. त्यांना अशा उपक्रमाच्या माध्यमातून दूर ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे मुले योगाकडे वळत असतील तर हा खरा बदल आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ आरोग्य नाही तर संस्कारांचाही पाया पक्का होतो. हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सगळ्यांसाठीच महत्त्वाचे असून ‘लोकमत’चे खूप खूप अभिनंदन...! -डॉ. सागर गणपतराव बालवाडकर (संचालक, सीएम इंटरनॅशनल स्कूल)

विश्वविक्रमावेळी भुजंगासन साकारताना प्रत्येक मुलाचा चेहरा शांततेचा अनुभव घेत होता. श्वासावर अन् शरीरावर नियंत्रण आणि मनाची शांती त्यातून दिसून येत होती. या प्रत्येक घटकाचा अनुभव या मुलांनी लहान वयातच घेतला आणि याच अनुभवातून रुजले ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे, मनावर ताबा ठेवणे आणि जबाबदारीची जाणीव राखणे. लोकमत कॅम्पस क्लबच्या माध्यमातून या जागतिक विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डने घेतली, याचा सार्थ अभिमान आहे. -रुचिरा दर्डा (लोकमत कॅम्पस क्लब आणि लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका, मोटिव्हेशनल स्पीकर)

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनSchoolशाळाStudentविद्यार्थी