शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार १७ फेब्रुवारीला : नावनोंदणीला सर्वच स्तरांतून वाढता प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:37 AM

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या संख्येने या शर्यतीसाठी सहभाग निश्चित केला जात आहे.

पुणे - ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या संख्येने या शर्यतीसाठी सहभाग निश्चित केला जात आहे. अनेक संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून हजारो पुणेकरांच्या सहभागाने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलापासून या शर्यतीचा थरार रंगेल. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत आहे.शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध क्षेत्रांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, सैन्यदलातील पदाधिकारी, विदेशी नागरिक अशा अनेक विविध घटकांकडून उत्स्फूर्तपणे नावनोंदणी होत असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे ‘लिमिटेड एडिशन’ पदक मिळविण्यासाठी धावपटू १० व २१ किलोमीटर गटात सहभागी होण्यासाठी प्राधान्य देत आहेत. सहकुटुंब धावण्यासाठी नोंदणी करणारे सदस्य ‘फॅमिली रन’ व ‘फन रन’ या गटात उत्साहाने नावनोंदणी करत आहेत. ‘लोकमत महामॅरेथॉन’ या ‘सर्किट रन’मध्ये राज्यातील ५ शहरांचा समावेश आहे. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम राबविणारे ‘लोकमत’हे एकमेव वृत्तपत्र आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांत झालेल्या या शर्यतीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला आहे. पुण्यात या ‘सर्किट रन’चा समारोप होत आहे.नावनोंदणीसाठी लागली रीघ...सर्वसामान्य आबालवृद्धांसह व्यावसायिक धावपटू, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, कर्मचारी, खासगी उद्योगसमूहाचे संचालक, कर्मचारी आदींच्या प्रत्यक्ष नोंदणीसह सहभागामुळे भरघोस प्रतिसाद लाभत आहे. विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि विविध तालीम संस्था, मंडळे, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी हे समाजातील विविध घटक या स्पर्धेत धावण्याची तयारी करीत आहेत. यामुळे १७ फेब्रुवारी रोजी रंगणाऱ्या स्पर्धेच्या थराराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नोंदणीसाठी अवघे काहीच दिवस उरले असल्याने अनेकांनी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील विविध ठिकाणांच्या नोंदणी केंद्रांवर सकाळपासूनच नोंदणीसाठी रीघ लावली होती. यात युवावर्ग, ज्येष्ठ धावपटू, महिलांचा सहभाग अधिक होता.पोलीस मित्र संघटनेचा पाठिंबापोलीस मित्र संघटनेने ‘लोकमत महामॅरेथॉन’ला पाठिंबा जाहीर केला आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कार्याध्यक्ष बाबासाहेब घाळे म्हणाले, ‘‘पोलिसांना सहकार्य करण्याच्या हेतूने विजय पाटील यांनी १८ वर्षांपूर्वी या संघटनेची स्थापना केली. समाजातील सर्व घटकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणारे पोलीस हे सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. नागरिकांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य ते व्यवस्थितरीत्या पार पाडतात. याबरोबरच आपण नागरिकांनीसुद्धा त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. नागरिक आणि पोलीस या दोघांमधील संवाद वाढायला हवा, यासाठी आमचा प्रयत्न असतो. अपघातग्रस्त लोकांना मदत, वृक्षारोपण, पोलिसांना मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी सहकार्य असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. ‘जागते रहो’ या उपक्रमांतर्गत पोलीस मित्र पथक रात्री गस्त घालतात. त्यामध्ये महिलांची सुरक्षा, चोरांना पकडणे, रात्री सर्व ठिकाणी फिरून पाहणी करणे अशी कामे केली जातात. यासाठी फिटनेस आवश्यक असतो आणि फिटनेससाठी धावण्यासारखा आदर्श व्यायामप्रकार नाही. पुणे शहर निरोगी आणि भयमुक्त व्हावे, या भावनेतून आम्ही ‘लोकमत महामॅरेथॉन’ला पाठिंबा देत आहोत.लेट्स रन फॉर हेल्दी अ‍ॅण्ड हॅपी पुणे!‘लोकमत’ ज्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपतो, त्याची मी फॅ न आहे. असाच सामाजिक बांधिलकी जपणारा एक उपक्रम म्हणजे ‘लोकमत महामॅरेथॉन.‘ ५ शहरांच्या सर्किट रनमधील पुण्यात होणाºया या अखेरच्या शर्यतीत सहभागी होण्यास मी उत्सुक आहे. ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे या महामॅरेथॉनचे घोषवाक्य मला सर्वाधिक भावले. हल्ली लोक आपल्या आरोग्याबद्दल जास्त सजग राहू लागल्याचे दिसून येत आहे. शरीर निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी संतुलित आहाराबरोबरच व्यायामाचे महत्त्वही लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे आपापल्या सवड आणि आवडीप्रमाणे लोक व्यायाम करताना दिसतात. कुणी सायकलिंग करतो, कुणी योगासने करतो तर कुणी पोहायला जातो. याबरोबरच धावणे हा व्यायामप्रकारही झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यासाठी अनेक शहरांमध्ये रनिंग ग्रुप्सही कार्यरत आहेत. मी व माझे कुटुंबीय अर्थातच ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होणार आहोत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरिकांनीही या ऊर्जादायी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.- जान्हवी र. धारिवाल, संचालक,आरएमडी फूड्स अ‍ॅण्ड बेव्हरेजेस प्रा. लि. आणि जेआरडी प्रिंटपॅक प्रा.लि.मॅरेथॉन आणि बुद्धिबळ हे परस्परपूरक !केवळ खेळ नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे महत्त्वाचे आहे. मॅरेथॉन आणि बुद्धिबळ हे क्रीडाप्रकार परस्परपूरक आहेत. कारण हे तुमच्या क्षमतांचा कस पाहणारे आणि पर्यायाने त्या क्षमतांचा विकास करणारे खेळ आहेत. पुण्यात मॅरेथॉन आणि बुद्धिबळ या क्रीडाप्रकारांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आता ‘लोकमत’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने ‘महामॅरेथॉन’ आयोजित केली असल्याने मॅरेथॉन आणखी लोकप्रिय होण्यास हातभार लागेल. पुण्यातील बुद्धिबळ क्षेत्राकडून ‘लोकमत महामॅरेथॉन’ला शुभेच्छा!पुणे व पिंपरी-चिंचवड येथील पुढील केंद्रांवर आजच नावनोंदणी कराबुधवार पेठ : मे. व्ही. व्ही. मेढी, तांबडी जोगेश्वरीजवळ -9028967505/020-24492149शिवाजीनगर : नीलिमा एंटरप्रायजेस, मनपासमोर-9881993738डेक्कन : प्राजक्ता अ‍ॅड्स, गुडलक चौक -25531909/9881243585शिवाजीनगर स्टँडजवळ : संजीवनी अ‍ॅडव्हरटायजिंग - 9545588869/ 59शुक्रवारपेठ मंडईजवळ : विविधसेवा, शनिपारजवळ -9422304260/ 9373082444हॅपी कॉलनी, : कोथरूड मानस एंटरप्रायझेस, काळे हॉस्पिटलसमोर -9881122277/ 9552579959बबवेवाडी मेनरोड : साई अ‍ॅडव्हरटायजिंग एजन्सी-9623441110/ 9822871110बिबवेवाडी : गणेश अ‍ॅडव्हरटायजिंग, भारत ज्योती बसस्टॉप -9822841930.कात्रज : अंकिता कम्युनिकेशन, भारती विद्यापीठामागे -7798056222 / 9767526999.सातारा रोड, धनकवडी : आकाश अ‍ॅडव्हर्टायझिंग, भारती हॉस्पिटलच्या शेजारी -7507589377/ 9850109077आंबेगाव पठार : धुमाळ एन्टरप्रायजेस - 9923123762.धायरी : ज्योती कम्युनिकेशन-7875117295.सिंहगडरोड, धायरी : शुभारंभ अ‍ॅड्स-8698593132/ 9850915353.माणिकबाग : सुमंगल एन्टरप्रायजेस -7620373637/ 8855052984.वडगावबुद्रुक : प्रॉम्पट सर्व्हिसेस -9881980985/9850225353.धायरी : संकल्पना कम्युनिकेशन - 9975293099.सिंहगडरोड, आनंदनगर : व्हायब्रंट कम्युनिकेशन -7507743019/020-24346362.सिंहगडरोड, माणिकबाग : डायनामिक मिडिया सोल्युशन-24354085/ 9850052570.औंधगाव : चोरडिया कम्युनिकेशन, पी.डी.सी.सी. बँकेजवळ -25886118/9960111123स्वारगेट : नवल पब्लिसिटी, वेगा सेंटर -24443001/2/ 9423566508.कॅम्प, जे.जे. गार्डन : मिनत अ‍ॅडव्हरटायजिंग, दस्तूर मेहेर रोड - 96898999481एम.जी. रोड : अ‍ॅड इंडिया, अरोरा टॉवरसमोर -9422083670/26131993हडपसर, आकाशवाणीसमोर : सह्याद्री अ‍ॅड्स सर्व्हिसेस - 9881098380हडपसर, तुकाईदर्शन : मुक्ता अ‍ॅड्स -8975693939/9881098379.हडपसर : विंग्ज मिडीया, राम मंदिरजवळ -9921160805/ 9922252724.खराडी बायपास : साई कम्युनिकेशन - 9881445550हडपसर, वैदूवाडी : कांकरिया अ‍ॅड्स, शंकरमठ, सोलापूर रोड - 9822463663/ 9890323663विश्रांतवाडी : उमानील पब्लिसिटी, बिग बझारसमोर - 9850004449वाघोली : धनश्री अ‍ॅडव्हरटायजिंग, शिवाजी पुतळ्याजवळ -9767294085/ 8983944984यमुनानगर निगडी बसस्टॉप : अमृद्धीक एन्टरप्रायझेस -7709292236/ 8484970712.पिंपरी स्टेशन : आकार अ‍ॅड्स -9923898181/020-27421874.नाशिकरोड, भोसरी : आर्यन अ‍ॅडव्हरटायजिंग - 9860134434/9922789596 .भोसरी : गुरुकृपा बुकस्टॉल, उड्डाणपुलाजवळ - 9850039711/ 9552558711.तळेगाव दाभाडे : चक्रधर अ‍ॅडव्हरटायजिंग, राव कॉलनी -8855873400/ 8855873500.चिंचवड, चाफेकरचौक : मयूरेश्वर एन्टरप्रायझेस - 8975002099/02027350043.चिंचवड : शशिकांत अ‍ॅडर्व्हटायझिंग, रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ -7507009797/9822306876.चिंचवड स्टेशन : श्रीराका अ‍ॅडव्हरटायजिंग, मेन रोड - 8956034222/ 020-27507211.जुनी सांगवी : श्री समर्थ प्रिंटर्स, शितोळेनगर - 9922437747/ 9822106616.चिंचवड, थरमॅक्सचौक : राज पब्लिसिटी-8446102102/ 8888903740.वल्लभनगर : चंद्रकांत एन्टरप्रायजेस -

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPuneपुणेLokmatलोकमत