शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:14 IST

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीमध्ये तळ ठोकून होते.

ठळक मुद्देमहायुती, महाआघाडीचे नेते अन् कार्यकर्त्यांची येणार फौजपुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी पुणे आणि बारामतीचे मतदान झाले मंगळवारी, मावळ आणि शिरूर सोमवारी

पिंपरी : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान मंगळवारी झाले. मतदान करवून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीला गेले होते. मावळ आणि शिरूरचे मतदान सोमवारी (२९ एप्रिल) असल्याने पुणे आणि बारामतीकरांचा मोर्चा उद्यापासून दोन मतदारसंघांकडे वळणार आहे.पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी पुणे आणि बारामतीचे मतदान मंगळवारी झाले, तर मावळ आणि शिरूरचे मतदान सोमवारी आहे. तिस-या टप्प्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीमध्ये तळ ठोकून होते. चौथ्या टप्प्यात मावळ व शिरूर लोकसभेची निवडणूक असल्याने  पुण्याएवढी पिंपरी-चिंचवड परिसरात रणधुमाळीत रंग भरला नव्हता. अत्यंत कमी प्रमाणावर प्रचार सभा, कोपरा बैठका आणि प्रचार फेºया होत होत्या.  पुणे आणि बारामतीतील मतदानासाठी गेल्या दोन दिवसांपासून या दोन मतदारसंघांतील कार्यकर्ते तळ ठोकून होते. युती आणि आघाडीचे कार्यकर्ते बूथवरही नियुक्त केले होते. मतदानाची टक्केवारी अधिक प्रमाणावर घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता, तर जाहीर प्रचार संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी छुप्या बैठकांचेही आयोजन केले होते. मतदारसंवाद आणि मते वळविण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

बुधवारपासून कार्यकर्ते अ‍ॅक्टिव्हमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुण्यात गेलेले मावळ आणि शिरूरमधील कार्यकर्ते पुन्हा मतदारसंघात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर रणधुमाळी संपल्यामुळे बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मावळ आणि शिरूरमध्ये दाखल होणार आहे............राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या होणार सभा ४राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, दिलीप कांबळे यांच्यासह आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी उद्यापासून तळ ठोकून राहणार आहेत. पुढील चार दिवसांत राज्य आणि राष्टÑीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचेही आयोजन केले आहे. युतीची प्रचार यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू आहे किंवा नाही, यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे लक्ष आहे. तसेच आघाडीच्या वतीने पिंपरी ते पनवेलपर्यंत हॉटेल, ढाबे आरक्षित केले असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक