Lok Sabha Election 2019 : पुण्यात मिळणार कमळाचे पेढे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 21:00 IST2019-05-22T20:57:57+5:302019-05-22T21:00:58+5:30
लोकसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना पुण्यात जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यात सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत असून नगरसेवकांनी फ्लेक्स तयार करायला टाकले आहेत. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक हेमंत रासने निकालासाठी मोठा पडदा लावणार असून गिरीश बापट यांचा विजय झाल्यास ते मोठ्या संख्येने मिठाईचे वाटप केले जाणार आहे.

Lok Sabha Election 2019 : पुण्यात मिळणार कमळाचे पेढे !
पुणे : लोकसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना पुण्यात जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यात सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत असून नगरसेवकांनी फ्लेक्स तयार करायला टाकले आहेत. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक हेमंत रासने निकालासाठी मोठा पडदा लावणार असून गिरीश बापट यांचा विजय झाल्यास ते मोठ्या संख्येने मिठाईचे वाटप केले जाणार आहे. इतकेच नव्हे पुण्यातील चितळे मिठाईच्या दुकानात कमळाच्या छापाचे पेढे मिळणार आहेत. यासाठी दैनंदिन किंमतीत पेढे मिळणार असून भाजप जिंकल्यास असे पेढे वाटले जाण्याची शक्यता आहे. याबाबत श्रीकृष्ण चितळे म्हणाले की, आम्ही कमळाचे छाप पेढ्यावर छापून देणार आहोत. मात्र असे पेढे तयार न करता मागणीनुसार ऐनवेळी तयार पेढ्यांवर छाप उमटवले जातील आणि त्यानंतर ते ग्राहकांना देण्यात येतील.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४पासून शत प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र मोहन जोशी यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यावरही त्यांनी प्रचारात दाखवलेला उत्साह काँग्रेसला पुन्हा 'अच्छे दिन' दाखवेल का, याबद्दल उत्सुकता आहे.