पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:04 PM2020-03-30T22:04:17+5:302020-03-30T22:10:07+5:30

पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

'Lock Down' as usual in Pune; ignore all roamers, Pune Police clarify the situation | पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा सुरु राहणार : सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे यांची माहिती पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

पुणे : पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

पुढचे तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन शहर बंद राहणार असल्याचे आवाहन करताना पोलीस व्हिडिओमध्ये दिसत आहे. सकाळी ६ ते ९ या दरम्यान फक्त दुध विक्रीसाठी खुले राहणार आहे. या काळात मेडिकल दुकाने सुरु राहणार असून किराणा दुकान बंद राहणार आहेत, असे त्यात सांगितले जात आहे. हा बंद पुणे शहरातील असल्याचे मेसेजमध्ये सांगितले जात आहे.

याबाबत पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पुणे शहरातील नाही. दुपारपासून एका चौकात पोलीस गाडी काही अनावून्समेंट केली जात आहे. सर्व नागरिकांना सुचित करतो की, हा व्हिडिओ पुण्यातील नाही. यापूर्वी पोलिसांनी संचारबंदीला लागू केली आहे. त्याचे आदेश सर्वांना दिले आहेत. या आदेशातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहेत. पुणे शहरात जीवनावश्यक सेवा, किराणा दुकान, मेडिकल दुकान खुली राहणार आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टंन्सिंगचे आदेश दिले आहेत. ते सर्वांनी आवश्यक पाळावे. विनाकारण बाहेर पडू नये. कोणीही अफवा पसरवू नये. अफवा पसरविणार्‍यांवर पोलीस कारवाई करतील. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिसवे यांनी केले आहे.

Web Title: 'Lock Down' as usual in Pune; ignore all roamers, Pune Police clarify the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.