शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 09:51 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी एका दिवसात आठ हजार रुग्णांचा टप्पा कधीच ओलांडला असून, पुणे पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे व्हाॅटस्पाॅट ठरले आहे. यामुळेच आज रोजी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणा-या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यात लॉकडाऊन जाहिर करतात की निर्बंध अधिक कडक करणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करा व रुग्ण संख्या कमी नाही झाली तर 2 एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे प्रशासकीय हालाचलींना वेग आला आहे.  या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे.या बैठकीत पुण्यात  लॉकडाऊन करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू  दर किती, सध्या हाॅस्पिटलची काय स्थिती आहे, कोरोना लसीकरण याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 200 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, असा सूरही उमटत आहे. गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैराण केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळाला. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.  त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? याबाबत बैठक पार पडेल.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक