शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कर्जरोख्यांसाठी भरावे लागले ३० कोटी रुपयांचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:48 IST

फायद्यापेक्षा तोट्याचाच धोका...

ठळक मुद्देयोजना कागदावरच तरीही सव्वाशे कोटींचा खर्चप्रकल्पाला हवे सक्षम नेतृत्व

लक्ष्मण मोरे-पुणे : शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी आवश्यक निधी कर्जरोख्यांद्वारे (म्युन्सिपल बाँड) उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने २०० कोटींचे कर्जरोखे काढले खरे परंतू, आतापर्यंत पालिकेला त्यापोटी तब्बल ३० कोटींपेक्षा अधिक व्याज द्यावे लागले आहे. त्या तुलनेत पालिकेला अल्प व्याज मिळाले आहे. आतापर्यंत यातील १२५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, पालिकेकडे अवघे ८० कोटी रुपयेच शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्जरोखे केवळ नाम कमावण्यासाठी काढण्यात आले होती की कामासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला होता. पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याकडे पाहिले जात होते. या प्रकल्पासाठी सुरुवातीला केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचा २० टक्के तर महापालिकेचा ३० टक्के सहभाग असे योजनेचे स्वरुप होते. परंतू, पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हा प्रकल्प १०० टक्के पालिकेच्याच निधीवर उभारण्याचा निर्णय घेतला. ही योजना पालिकेच्या निधीमधून अंमलात येणे अवघड असल्याचे कारण देत अर्थसाह्य घेण्याचा निर्णय झाला. आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याच्या प्रस्तावाला तत्कालीन स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्येही मंजुरी मिळविण्यात आली. कर्जरोख्यांचा कोणताही अतिरिक्त बोजा पालिकेवर पडणार नसून, पाणीपट्टी वाढीतून जमा होणाºया निधीतून परतफेड केली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतू, हा प्रकल्प अद्यापही गती घेऊ शकलेला नाही. तरीही पाणीपट्टी वाढीमधून पुणेकरांच्या खिशातून ३० कोटी रुपये काढण्यात आले आहेत. कर्जरोख्यांचे व्याज पालिकेला भरावे लागत आहे. आतापर्यंत जवळपास ३० कोटींपेक्षा अधिक व्याज पालिकेने भरले आहे. तर पालिकेला २० कोटींच्या आसपास व्याज मिळाले आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे जे काही थोडे-फार काम झाले आहे त्यापोटी आतापर्यंत सव्वाशे कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कर्जरोखे काढणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका असल्याचा मान मिरविण्याकरिता कर्जरोख्यांचा घाट घातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. पालिकेच्या ६००-७०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. त्यापैकी २०० कोटी रुपयांचा वापर करता येऊ शकला असता. तसेच ठेकेदारांच्या कोट्यवधींच्या अनामत रकमा पालिकेकडे आहेत. त्यांचाही या प्रकल्पासाठी सुरुवातीला वापर करता आला असता. परंतू, हे पैसे न वापरता पहिल्या दिवसापासून व्याज द्यावे लागणारा पर्याय निवडण्यात आला. सत्ताधाºयांनी आर्थिक हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ......प्रकल्पाला हवे सक्षम नेतृत्वही योजना राबविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. ‘टीम’ म्हणून या प्रकल्पावर काम होताना दिसत नाही. चांगले अभियंते या प्रकल्पावर नाहीत. केवळ सात ते आठच अभियंत्यांवर हा कारभार सुरु आहे. वास्तविक या प्रकल्पासाठी ३0  च्या आसपास अभियंत्यांची आवश्यकता आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीkunal kumarकुणाल कुमार