शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भाडेकरुंनी देखील मोबाईल क्रमांक जोडावेत : महावितरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 21:10 IST

खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो.

ठळक मुद्देविद्युत सेवेचीच संपूर्ण माहिती पाठविणारपुणे परिमंडलातील २७ लाख ४९ हजार वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद

पुणे : खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो. मात्र, शहरातील अनेक भाडेकरुंनी आपला मोबाईल क्रमांक न दिल्याने ते वापरत असलेल्या मीटरची माहिती त्यांना मिळत नाही, अथवा ती घरमालकाच्या मोबाईल क्रमांकावर जाते. त्यामुळे भाडेकरुंनी देखील आपला मोबाईल क्रमांक  द्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. पुणे परिमंडलातील २७ लाख ४९ हजार वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. त्यांनी वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. तसेच, मोबाईलवर पाठविलेला बिलाचा तपशील दाखवून विद्युत बिल देखील भरता येते. या शिवाय वीज ग्राहक राहत असलेल्या परिसरातील पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती, त्याचा कालावधी देखील ग्राहकांना कळविला जातो. या शिवाय नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याची माहिती आणि विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु होण्याच्या संभाव्य कालावधीची माहिती देखील ग्रहकांना दिली जाते. तसेच, दरमहा वीज बिलाची रक्कम, देय दिनांक याचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही मोबाईलवर पाठविली जाते. मात्र, शहरातील अनेक भागामधे भाडेकरु राहत आहेत. त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंद झाल्याने, भाडेकरुंना त्याची माहिती मिळत नाही. प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि खराडी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे वीज वापरकर्त्यांनी अथवा भाडेकरुंनी आपण वापरत असलेल्या ग्राहक क्रमांकासोबत आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा. ---------------------अशी करा मोबाईलची नोंद पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यात २९ लाख २६ हजार वीजग्राहक आहेत. यापैकी ८३.९२ टक्के म्हणजे २७ लाख ४८ हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. ग्राहकांना महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ह्यएसएमएसह्णद्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. कॉल सेंटरच्या १९१२ अथवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.  

 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणMobileमोबाइलHomeघर