शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 2:24 PM

आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे.

ठळक मुद्दे आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन

पुणे : आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. मराठी शाळा कशा टिकवायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळा जगल्या तरच भविष्यातील वाचक निर्माण होईल. वाचकच नसेल तर मराठी साहित्यही लिहिले होणार नाही. आताच पुस्तकांचा खप कमी होतो आहे, अशी पुस्तक विक्रेत्यांची तक्रार आहे. मराठी भाषेला चांगले दिवस दाखवून अत्रेचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आणि विनोद विद्यापीठातर्फे आचार्य अत्रे स्मृती अर्ध शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संमेलन अध्यक्षांचे महासंमेलनात अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल अवचट, मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील प्रतिमा परदेशी, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद लुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.बाबुराव कानडे म्हणाले, ‘सरकारवर नियंत्रण ठेवणारी शक्ती नसल्याने आता अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. बोलके साहित्यिक खूप असतात, अत्रे कर्ते होते. बोलते आणि कर्ते साहित्यिक एकत्र आल्याशिवाय अभिजात दर्जा मिळणार नाही.’कांबळे म्हणाले, ‘सामाजिक बहिष्कृततेचे जीणे हा सामाजिक द्वेष. दलित, पददलितांनी हा द्वेष हजारो वर्षे सहन केला. संत ज्ञानेश्वरही यातून सुटले नाहीत. त्यांनी घेतलेली संजीवन समाधी ही मी आत्महत्याच मानतो. सामाजिक दाहकतेचे विष त्यांना प्यावे लागले. त्यांनी ही खंत व्यक्त केली असती, बहिष्काराबाबत एखादे वाक्य लिहिले असते तरी मराठी वाड्मयाचे रुपडे पालटले असते. अत्रेंच्या काळातील लोक विवेकी होते. आजची मराठी मानसिकता ही खुरट्या झुडुपासारखी आहे.’लुलेकर म्हणाले, ‘गांधीजी गेल्यानंतरही त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या जातात, ही विकृती आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपल्याला सावध रहायला हवे. आता प्रत्येक जातीचे अहंकार जागे झाले आहेत. त्यामुळे काहीच बोलण्याची सोय राहिलेली नाही. पूर्वी वैचारिक लेखनाने राजकीय, सामाजिक नेतृत्व केले. आज वैचारिक लेखनच मराठी साहित्यात होत नाही. नव्याने इतिहास घडल्याशिवाय सांस्कृतिक परिवर्तन घडणार नाही.’प्रतिमा परदेशी म्हणाल्या, ‘मराठी साहित्यात कायमच दुजाभाव होत आला आहे. साहित्य संस्थांमध्ये सारस्वतांचे राजकारण घडत आहे. सर्जनशील साहित्याची निर्मिती हा पहिला प्रवाह, तर शिक्षण मिळू न शकलेल्या स्त्रिया, बहुजन समाज यांनी लिहिलेले साहित्य हा दुसरा प्रवाह आहे. अत्रेंची विचारांवर, ध्येयावर निष्ठा होती. अत्रेंच्या पद्धतीने आज विचार केला तर नक्की बदल घडेल.’ 

टॅग्स :PuneपुणेAnil Avchatअनिल अवचटmarathiमराठी