शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

ऐकावं ते नवलच..! पुण्यात काँग्रेसच्या ‘एका’ जागेसाठी तिघांनी बांधले बाशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 8:25 PM

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही.

ठळक मुद्देगायकवाड, छाजेड, शिंदे यांनी घेतले अर्ज पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, कॉंग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या तिघा उमेदवारांच्या वतीने चार अर्ज निवडणूक कार्यालयातून नेण्यात आले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या वतीनेही उमेदवारी अर्ज नेला आहे. या मतदारसंघातून ४९ जणांनी अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. बारामती मतदारसंघातून ५४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास गुरुवारपासून (दि. २८) सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा झालेले प्रवीण गायकवाड यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. तर, आणखी एक चचेर्तील उमेदवार अरविंद शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे प्रक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, मनसेच्या सुहास निम्हण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत ४९ उमेदवारांनी अथवा त्यांच्या वतीने ८० अर्ज नेण्यात आले आहेत. यातील २५ जणांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. बारामतील लोकसभा मतदारसंघात गेल्या ५४ जणांनी अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी शुक्रवारीच अर्ज नेले आहेत. शुक्रवारी सोळा जणांनी अर्ज नेले असून, त्यात ९ अपक्ष इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अजित पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेला आहे.  -------------------

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक