शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ऐकावे ते नवलच ! पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीनंतर आता नगरसेविका सहायता निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:37 PM

आवाहनाचे मेसेज आणि तशा इमेजेस सोशल मीडियावर.... एका संस्थेच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन

ठळक मुद्देएका संस्थेच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन पुणे महापालिकेनेही त्यांच्या सहायता निधीला मदत करण्याचे केले आहे आवाहन

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वत्र मदत पोचविण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत देण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. पुणे महापालिकेनेही त्यांच्या सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. याच्या दोन पावले पुढे जात आता नगरसेवकांनीही स्वत:चा सहायता निधी सुरू केला असून नागरिकांना मदतीचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. येरवड्यातील प्रभाग क्रमांक सहामधील एका नगरसेविकेच्या नावाने हा निधी गोळा केला जात आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता श्रीशेठ चव्हाण यांच्याकडून नागरिकांना मदतीचे आवाहन केले जात आहे. वास्तविक अशा स्वरूपाची मदत गोळा करायला धमार्दाय आयुक्तांची परवानगी लागते. नोंदणीकृत संस्था मदत घेऊ शकते. चव्हाण यांच्या आवाहनाचे मेसेज आणि तशा इमेजेस सोशल मीडियावर पाठवल्या जात आहेत. या इमेजमध्ये बँकेचे खाते, शाखा आदी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटोही आहेत. एखादी संस्था अथवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ४१सी (२) नुसार परवानगीसाठी अर्ज करणे कानी त्यातील तरतुदींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच जमा केलेल्या वर्गणीचा हिशोब देणे आवश्यक आहे. हिशोब दिल्यास अशा व्यक्तीस मागाहून सुधा परवानगी दिली जाउ शकते. परंतु, हिशोब न दिल्यास अथवा जमा वर्गणीचा गैरवापर केल्यास फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल हाऊ शकतो असे पुण्याच्या धमार्दाय सहआयुक्तालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महापौर मदत निधी हा नियमावलीतच आहे. परंतु नगरसेवकांच्या नावाने निधी मागता येत नाही. चव्हाण यांनी मदतीचे आवाहन केलेली संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेच्या नावाने मदत मागण्याऐवजी नगरसेविकेच्या नावाने मदत मागत त्याला नगरसेविका सहायता निधीचे नाव देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ------------- आमच्या प्रभागात ९५ टक्के लोकवस्ती ही झोपडपट्टीत राहणारी आहे. गोरगरिबांना मदतीची आवश्यकता आहे. अनेकजण मदत करायला पुढे येत आहेत. गोरगरिबांकडून रेशनसोबत खचार्साठी थोड्याफार पैशांचीही मागणी होते. आम्ही नागरिकांना धान्य, भाज्या, औषधे आदींची मदत करीत आहोत. नागरिकांना मदतीचे आवाहन केले असून वायएमसी मेमोरियल फाऊंडेशन या नोंदणीकृत संस्थेचा खाते क्रमांक दिला आहे. त्यातून अन्नधान्य आणि आर्थिक मदत केली जाणार आहे. - श्वेता चव्हाण

टॅग्स :PuneपुणेfundsनिधीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेनाhospitalहॉस्पिटल