शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेट; वसतिगृह प्रमुख म्हणतात, शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:40 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जात असताना विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सापडणे आश्चर्यकारक

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळली. दरम्यान, संबंधित शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन केल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ वसतिगृह प्रशासनाने दिले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जात असताना विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सापडणे आश्चर्यकारक आहे. याप्रकरणी दोषी विद्यार्थिनींवर आणि हा सर्व प्रकार दडपणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. सदर प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील असल्याचे विद्यापीठाकडून नमूद करण्यात आले आहे.

ही घटना फेब्रुवारीतील असून, त्याबाबत विद्यापीठ वसतिगृहामध्ये तक्रार प्राप्त होताच विद्यार्थिनीचे समुपदेशन केले तसेच त्या विद्यार्थिनीचे वसतिगृहाच्या दुसऱ्या इमारतीत स्थलांतर केले होते. या प्रकरणी वसतिगृह प्रशासनाने नियमांनुसार चौकशी करून संबंधित विद्यार्थिनीवर समुपदेशन व वर्तन सुधारण्याच्या दृष्टीने कारवाई देखील केली होती. तिच्या पालकांना देखील कल्पना दिली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय? 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळून आली. वसतिगृहात वास्तव करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत.  असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात आलीय. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कटरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली होती. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीWomenमहिलाSocialसामाजिक