शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:26 IST

टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि त्या २ मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या

थेऊर : घराच्या सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारताना महिलेला विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आशा विठ्ठल अवसरे (वय ३६, महादेव मंदिराजवळ, काकडे मळा, थेऊर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.             मिळालेल्या माहितीनुसार, आशा अवसरे यांच्या दोन मजली घराचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू होते. आशा या दररोज बांधकामावर पाणी मारत असत. नेहमीप्रमाणे आशा या मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या बांधकामावर पाणी मारत होत्या. घराच्या बांधकामावर पाणी मारल्यानंतर आशा या टेरेसवर पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि आशा या दोन मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या. या अपघातात आशा या गंभीर जखमी झाल्या होत्या.

दरम्यान, आशा यांना तातडीने लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु आशा यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने थेऊरसह परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाHealthआरोग्यWaterपाणीhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूelectricityवीज