शहरं
Join us  
Trending Stories
1
किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!
2
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
3
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
4
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
5
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
6
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
7
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
8
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
9
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
10
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
11
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
12
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
13
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
14
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?
15
“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
16
लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 
17
आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."
18
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."
19
नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?
20
सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल

माशांचे जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 8:20 PM

माशाचे जेवण न बनविल्याचा रागातून पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आली होती.

पुणे : माशाचे जेवण न बनविल्याचा रागातून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. संतोष रुपा वाघमारे (वय ४०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. पार्बता संतोष वाघमारे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विजय बंडु लालगुडे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. २ एप्रिल २०१६ रोजी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान ही घटना घडली. लालगुडे यांचा शेतीचा व्यवसाय असून, संतोष व पार्बता हे दोघे त्यांच्या शेतामध्ये मजुरीचे काम करायचे. पार्बता हीला दारुचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी संतोष व पार्बता हे दोघे मासे घेण्यासाठी कामशेत येथे आले होते. त्यावेळी संतोष हा माशे घेत असताना पार्बता हीने त्याची नजर चुकवून दारू पिली. घरी परत आल्यानंतर दारूच्या नशेत पार्बता ही स्वयंपाक न करताच झोपली. त्यामुळे माशाचे जेवण न केल्याच्या रागातून संतोष याने पार्बता हीला सरपणातील लाकडी दांडक्याने डोक्यात, पायावर मारहाण करून तीचा खून केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. हांडे यांनी युक्तीवादा दरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने संतोष याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.    

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसjailतुरुंग