शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:38 IST

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देसंबंधित हा सर्व प्रकार असल्याने त्याची वरिष्ठ पातळीवरुन तपासणी सुरु

पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. 

रश्मी आशुतोष मिश्रा (वय ४३, रा. डेहराडुन) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत ९ वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी या लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. ४३ वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. कौटुंबिक कारणावरुन तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांनी भेट दिली असून लष्कराची संबंधित हा सर्व प्रकार असल्याने त्याची वरिष्ठ पातळीवरुन तपासणी सुरु आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसForceफोर्सDeathमृत्यू