फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 04:08 PM2020-11-15T16:08:49+5:302020-11-15T16:21:20+5:30

Pollution in Pune : शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

The level of pollution caused by firecrackers is over two hundred in pune | फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर

फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी दोनशेवर, रात्री सर्वत्र धूरच धूर

googlenewsNext

पुणे : कोरोनामुळे दिवाळीलाफटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. परंतु, नागरिकांनी उत्साहामध्ये फटके फोडले. दरवर्षीप्रमाणे यंदा ‘आवाज’ जरा कमीच होता. पण रात्री दहाच्या सुमारास सर्वत्र धूर धूर दिसत होता. परिणामी शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

लॉकडाऊनमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती. अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यात दिवाळीतफटाके फोडल्याने ती धोकादायक बनली.  प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होतो. कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती फुप्फुसविकारतज्ज्ञ आणि चेस्ट रिसर्च फांउडेशनचे प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी केली होती. त्याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी तयार करून व्हायरल केला होता.  ज्यांना फुप्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या फटाक्यांच्या धुराने अधिक त्रास होऊ शकतो. 

प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम? 

शहरात कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात. 
 
पीएम २.५ हवेची पातळी 
० ते ५० : उत्तम 
५० ते १०० : समाधानकारक 
१०० ते २०० : धोकादायक 
२०० ते ३०० : अत्यंत धोकादायक 

शिवाजीनगर :२०० 
कात्रज : १३५ 
हडपसर : १०२ 
भूमकर चौक : १३२
भोसरी : १०२ 
पाषाण : ८४

Web Title: The level of pollution caused by firecrackers is over two hundred in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.