VIDEO | " 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर..."; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना धमकीचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:07 PM2022-05-30T20:07:20+5:302022-05-30T20:22:57+5:30

मेलवरून धमकी देण्यात आली आहे...

letter of threat to Shiv Sena leader Neelam Gorhe If the decision of widows | VIDEO | " 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर..."; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना धमकीचे पत्र

VIDEO | " 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर..."; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना धमकीचे पत्र

Next

पुणे :शिवसेना नेते नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र आले आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी विधवा महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पुण्यात गोऱ्हे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर गोऱ्हे यांच्या कार्यालयात एक मेला आला. त्यामध्ये, जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या मेलमध्ये व्यक्तीचे नाव आणि फोन नंबर देण्यात आली आहे.

राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले होते. 

राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी व्यक्त केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

Web Title: letter of threat to Shiv Sena leader Neelam Gorhe If the decision of widows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.