शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीला धडा

By admin | Updated: June 13, 2015 22:28 IST

जुन्नर बसस्थानक परिसर, बोडकेनगर, गजबजलेले शंकरपुरा पेठ, सदाबाजारपेठ अशा ठिकाणी कार पार्किंग व दुचाकी पार्किंगचे काही

जुन्नर : जुन्नर बसस्थानक परिसर, बोडकेनगर, गजबजलेले शंकरपुरा पेठ, सदाबाजारपेठ अशा ठिकाणी कार पार्किंग व दुचाकी पार्किंगचे काही ठिकाणी फ्लेक्स लावलेले असतानाही वाहतुकीस अडथळा करून बेशिस्त पार्किंग करणा-यांना जुन्नर पोलीस यंत्रणेने धडा शिकवत वाहनांची हवा सोडली. नगरपरिषद असणा-या जुन्नर शहराची लोकसंख्या विचारात घेता, सध्या जुन्नर शहराला वाहतुकीची समस्या भेडसावत असताना पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे यांनी पुढाकार घेतला. जुन्नर शहरात काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ तर काही ठिकाणी सम विषम तारखेला पार्किंग असे फ्लेक्स जुन्नर शहरात सर्वत्र लावले आहेत. त्यासाठी त्यांना जुन्नर शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, जुन्नर व्यापारी असोसिएशन शांतता समितीचे सदस्य, पत्रकार मित्र यांनी मोलाची साथ दिली.काही दिवस सुरळीत सुरू असलेली पार्किंगची कोंडी सुटली व पुन्हा जशी होती तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागल्याचे लक्षात आले. केवळ खटले न भरता व दंडात्मक कारवाई न करता वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांच्या वाहनांच्या दोन्ही चाकांतील हवा सोडून वाहनचालकांना शिस्त लावण्याचा एक प्रयत्न जुन्नर पोलिस करीत आहेत. वाहतूक नियोजनामध्ये जुन्नर नगरपरिषदेचा मोठा वाटा पाहिजे होता. परंतु, आधीच जुन्नर शहरातील रस्त्यांची लागलेली वाट व खोळंबलेली पाणी पाईप लाईन योजना, अकार्यक्षम प्रशासन यामुळे जुन्नरवासीयांना गेल्या काही वर्षांत सुविधा मिळाल्या नाहीत. महापालिका पार्किंग व्यवस्थेत काय योगदान देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाल ेकी, जुन्नर शहर हे ऐतिहासिक शहर असून मोठ्या प्रमाणावर पर्यटकही येत असतात. बेशिस्त पार्किंगची समस्या त्यांनाही भेडसवते. ज्या जड मालाच्या गाड्या वाहतूक समस्या निर्माण करतात, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता गुन्हे दाखल करण्यात येईल. (वार्ताहर)