Pune | नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:25 IST2023-04-24T12:20:26+5:302023-04-24T12:25:01+5:30

बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले...

Leopard roaming around Nazre Reservoir, fear among villagers jejuri news | Pune | नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत

Pune | नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत

जेजुरी (पुणे) :जेजुरीच्या पूर्वेला असणाऱ्या नाझरे जलाशयाच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाझरे जलाशयाच्या परिसरात नाझरे कडेपठार, नाझरे सुपे ही खेडी असून या परिसरारील ग्रामस्थांना गेल्या आठवड्यापासून बिबट्या दिसू लागला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असल्याने अचानक बिबट्याचे दर्शन कधी रस्त्यावर, शेताच्या बांधावर होऊ लागल्याने शेतकरी वर्ग ही धास्तावला आहे. अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याने रात्रीच्या वेळी शेतकरी बाहेर पडायला घाबरू लागले आहेत. ऊस शेती असल्याने बिबट्या नेमका कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने या दोन्ही गावांबरोबर आजूबाजूच्या गावांतूनही दहशत पसरू लागली आहे.

वनविभागाकडून याबाबत ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केली आहे.

Web Title: Leopard roaming around Nazre Reservoir, fear among villagers jejuri news