शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 21:34 IST

पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाने जाहीर केले आहे

पुणे : जळते मणिपूर वाऱ्यावर सोडून देश-परदेशात दौरे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही. त्यासंबंधी त्यांनी साधे निवेदनही प्रसिद्ध केलेले नाही. या निषेधार्थ पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाच्या राजकीय आघाडीच्या पुणे शाखेच्या वतीने जाहीर केले होते. तसेच महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर सकाळी निषेध आंदोलन करण्यात येणार होते. त्याअगोदरच पुणे पोलिसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कुठल्याही प्रकारे आंदोलन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

कॉग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने हे आंदोलन होत आहे. मणिपूरच्या घटनेविषयी तुम्ही अस्वस्थ आहात का? आपल्या देशातल्या एका भागामध्ये सुरू असलेल्या या वंशसंहाराच्या घटनांबद्दल तुम्हाला चिंता वाटते का? एकूणच देशातील केंद्र सरकारच्या कारभारामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय झाले आहे.  याविषयी आपली तगमग होत आहे का? जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आता शांत बसून चालणार नाही. लोकशाहीमध्ये सनदशीर शांततेच्या मार्गाने उद्या निषेध व्यक्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्ष उद्या पुणे शहरात करणार आंदोलन करणार आहेत. त्याच अनुषंगाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. 

पवार स्टेजवर, आम्ही आंदोलनात यात गैर काय! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मोदींविरोधी आंदोलनात सहभागी हाेणार असल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सगळीकडे याचीच चर्चा असताना पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ‘यात काही गैर नाही’ असे ते सांगत आहेत. शरद पवार देशातील सर्वमान्य नेते आहेत आणि ते राजकारण, समाजकारण यात कधीही गल्लत करत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला यात काही गैर वाटत नाही, असे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीagitationआंदोलनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliceपोलिस