खडकवासल्यातून तलावात पाणी सोडा; शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST2018-07-23T00:26:36+5:302018-07-23T00:27:05+5:30
खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे.

खडकवासल्यातून तलावात पाणी सोडा; शेतकऱ्यांची मागणी
भिगवण : खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे. मदनवाडी तलावात तातडीने पाणी न सोडल्यास सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मदनवाडी तसेच निंबोडी येथील शेतकºयांनी दिला आहे.
पर्जन्यमानात दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणावर अवलंबून शेती करावी लागते. यासाठीच धरणनिर्मिती वेळी येथील शेतकºयांनी जमीन देत शेतीसाठी पाणी मिळेल अशी आशा ठेवली होती. मात्र, खडकवासला विभागाकडून शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. धरणक्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहात आहेत. १०० टक्के भरलेल्या धरणाचे पाणी नदीत सोडले जात असताना कोरड्याठाक पडलेल्या तलावांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे या भागातील शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वाढत आहे. पाठीमागील काही वर्षांपूर्वी या भागातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव खडकवासल्याच्या माध्यमातून भरले जात होते. त्यामुळे येथील शेतकºयांचे जीवन सुफलाम होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून याकडे काणाडोळा केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे खडकवासला विभागाने चालू वितरणात या भागातील तलाव भरून घ्यावेत अन्यथा या परिसरातील शेतकरी सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे संतोष सोनावणे यांनी निवेदनाद्वारे
माहिती दिली.