शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाजपाच्या हातावर मताधिक्याचा शिक्का ! भाजपाला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 6:00 AM

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचा गड असलेल्या कोथरुड मतदारसंघ ढवळून काढूनही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात नेत्यांना यश मिळाले नाही...

ठळक मुद्दे कॉंग्रेस म्हणते मताधिक्य होणार कमी

पुणे : भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचा गड असलेल्या कोथरुड मतदारसंघ ढवळून काढूनही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात नेत्यांना यश मिळाले नाही. उलट गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत १.८४ टक्क्यांची घट झाली असून, एकूण मतादारांच्या अवघे ५०.२६ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळीही झालेल्या मतदानापैकी भाजपाच्या पारड्यात निम्मी मते पडली होती. त्यामुळे गत निवडणुकीप्रमाणे ४२ हजार ४०८ इतके मताधिक्य टिकविण्याचा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत. कॉंग्रेस मताधिक्य गेल्यावेळ इतके होणार नसल्याचे सांगत आहे. म्हणजेच या मतदारसंघातून भाजपाला मताधिक्य मिळेल असेच कॉंग्रेस सांगताना दिसत असल्याने, येथून मताधिक्य नक्की किती हाच प्रश्न असेल. कोथरुड मतदारसंघामध्ये २०१४ साली ३ लाख ४८ हजार ७११ मतदारांची संख्या होती. यंदा त्यात ५० हजार २५५ मतदारांची वाढ होऊन, ती ३ लाख ९८ हजार ९६६ इतकी झाली. यंदा त्या पैकी २ लाख ५२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्यावेळ पेक्षा मतदारांची संख्या १८ हजार ८१६ने वाढली असली एकूण मतदानाचा टक्का घटला आहे. भाजपाचे या विधानसभा मतदारसंघात २० पैकी १६ नगरसेवक आहेत. या मतदारसंघात भाजपाचीच निर्विवाद ताकद आहे. मतदारसंघ पुर्नरचनेत २००९ साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे या मतदारसंघाचे पहिले आमदार. हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयमसेवक संघाच्या विचारांना मानणाºया वर्गाचा या मतदारसंघात प्रभाव आहे. तरीही भाजपाने या भागात जोरदार प्रचार केला. केंद्रीय नेत्यांच्या सभा, प्रचारफेरी, मतदारांच्या गाठीभेटी या माध्यमातून भाजपा-शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता. त्या तुलनेत कॉंग्रेसचे अस्तित्व येथे फारसे नाही. मात्र, मोदी लाटेतही कॉंग्रेसचे २०१४मधील उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी ५४ हजार ९६८ मते पडली होती. खासदार अनिल शिरोळे यांच्या पारड्यात एकूण झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. जवळपास २५ टक्के मते डॉ. कदम यांना होती. गेल्यावेळ पेक्षा यंदा मतांचा आकडा वाढवून या भागातील पिछाडी कमी करण्यावर कॉंग्रेसचा भरहोता.------------------ 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाVotingमतदान