शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीची फौज करणार करवसुली

By admin | Updated: August 9, 2015 03:47 IST

राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: रद्द केला असला तरी, शहरातील तब्बल ९९ टक्के व्यापारी या करातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे या एलबीटी विभागातील कामकाजही

पुणे : राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: रद्द केला असला तरी, शहरातील तब्बल ९९ टक्के व्यापारी या करातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे या एलबीटी विभागातील कामकाजही जवळपास ९० टक्के कमी झाले असल्याने या विभागातील सुमारे १०० कर्मचारी मिळकतकर विभागास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून करआकारणी न झालेल्या इमारती शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने १ आॅगस्टपासून ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे त्यांनाच हा कर ठेवला आहे. त्यामुळे शहरातील एलबीटी भरण्यासाठी नोंदणी झालेल्या ७० हजार व्यापाऱ्यांपैकी केवळ १२१ व्यापारीच या करमर्यादेत आहेत. त्यामुळे एलबीटी विभागाकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या विभागातील सुमारे १०० कर्मचारी करसरंकलन विभागास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)उत्पन्न बुडत असल्याने निर्णयएलबीटीपाठोपाठ महापालिकेस सर्वाधिक ७०० ते ८00 कोटी उत्पन्न हे मिळकतकराच्या माध्यमातून मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात नवीन झालेली बांधकामे आणि महापालिकेच्या अटींमुळे लाखो इमारतींना तसेच मिळकतींना कराची आकारणी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडत अहे. आता एलबीटीही रद्द झाल्याने पालिकेस मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन करआकारणी न झालेल्या तसेच वापर बदल झालेल्या मिळकती शोधून नवीन करआकारणी करणे, तसेच थकबाकी वसुलीचे काम या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.अतिक्रमण पोलीस ठाण्यासाठी जागा महापालिकेच्या मागील बाजूस असलेली जकातीची इमारत दोन वर्षांपूर्वी एलबीटी विभागास देण्यात आली होती. या इमारतीच्या तिनही मजल्यांवर एलबीटीचे काम सुरू होते. मात्र, आता त्यातील काही ठिकाणे पालिकेच्या अतिक्रमण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहेत. या विभागाचे काम 1 आॅगस्टपासूनच बंद होण्याची शक्यता गृहीत धरून ही जागा पोलीस ठाण्यास देण्यात आली होती.