शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

”वकीलसाहेब, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका.." बाप ढसाढसा रडला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:11 IST

'तीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते', या वक्तव्याने वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे यांचे वकील विपुल दुशांकी यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर अजब वक्तव्य केले आहे. तीचे नको ते चॅट सुरु होते. नको त्या व्यक्तीसोबत ती बोलत होती. कानाखाली मारणे हा छळ नाही असं ते माध्यमांसमोर म्हणाले आहे. त्यांनतर या वकिलांवर टीकेचे झोड उठत आहेत. सर्वत्र समाजातून वकिलाच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या वक्तव्याने वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका अशी विनंती करत ते माध्यमांसमोर ढसाढसा रडले आहेत. वैष्णवी आत्महत्या करण्याबद्दल पाच ते सहा दिवस सातत्याने हगवणे कुटुंब मारहाण करत होते. वैष्णवी वर आता काही आरोप करत शिंतोडे उडवू नका असे त्यांनी सांगितले आहे. 

अनिल कस्पटे म्हणाले, काल आरोपीचे वकील बोलले ते मी आणि समाजाने ऐकले. ते चुकीचे बोलले. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहेत. त्यांनी केलेले कृत्य माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायची आहे. मोबाईल चॅटिंग बाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलीही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतला आहे. माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं ते म्हणाले. मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मी तिला मोबाईल दिला कशाला? तर आरोपी जावई याला १ लाख ५२ हजाराचा मोबाईल दिला. त्यांनी मागितला त्यानुसार आम्ही दिला. विकत घेतलेला मोबाईलची रिसीट दाखवली. आजही मी आरोपीला दिलेल्या मोबाईलचे हप्ते भरत आहे. 

लग्न मोडण्याला हगवणे कुटुंब जबाबदार

छळ केला नाही म्हणत आहेत गाडी नाही मागितली म्हणतात. फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं म्हणून फॉर्च्युनर दिली. आरोपीकडे 5 कोटीच्या गाड्या नाहीत. याच्याकडे एकच गाडी  मी दिलेली आहे. गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती. अगोदर दोन लग्न मोडली होती. माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची मागणी सोन्याची मागणी त्यांनी केली. अधिक महिन्यात इतर मागणी करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहेत. 

निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ कसे गेले? 

वैष्णवीचे मामा म्हणाले,  सुनेचा मृत्यू झाला हे कळल्यावर त्यांना बाळाचे सुचले कसे. निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी होता. त्यावेळी तिथं तो ही तिथं होता. ज्यावेळेस कस्पटे कुटुंब बाळाला आणायला गेले. त्यावेळेस त्या ठिकाणी ते नव्हते. परत आम्हाला सांगण्यात आले. मग आमचे कुटूंब त्या बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाण याच्या घरी गेले. बाळ आणायला गेले त्यावेळेस पिस्तूल दाखवून भीती दाखवली. निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ कसे गेले हा आमचा प्रश्न आहे.

जालिंदर सुपेकर यांचा हगवणे कुटुंबाशी संबंध

हगवणे यांनी आमच्याशी निगडीत बांधकाम व्यावसायिकाकडे पैसे मागितले होते. वकील असे बोलतात ही हास्यास्पद गोष्ट आहे. चार चापटा मारणे म्हणजे गुन्हा नाही हे वाईट आहे. आमचं जालिंदर सुपेकर यांचा काही संबंध आला नाही. मामा म्हणून सुपेकर जालिंदर अस पत्रिकेत नाव आहे. त्याचा हगवणे कुटुंबाशी संबंध आहे. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयFamilyपरिवार