गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 09:08 AM2022-08-18T09:08:29+5:302022-08-18T09:08:41+5:30

सध्या एका बिटकॉइनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये

Lawyer cheated out of crores on the pretext of investment Case against 7 persons including Bitconnect's Satish Kumbhani | गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

Next

पुणे : मूळ बिटकॉइनच्या गुंतवणुकीवर त्याच्यापेक्षा अधिक बिटकॉइनचा परतावा मिळाल्याचे दर्शवून ते बिटकॉइन क्रिप्टो करन्सीच्या प्रॉझी स्किममध्ये गुंतवणूक करायला भाग पाडून एका वकिलाला तब्बल २२० बिटकॉइनला (किमान ४२ कोटी रुपये) गंडा घालण्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथील एका वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बिटकनेक्ट कंपनीचे मालक सतीश कुंभाणी, एटीसीसी कॉइनचे मालक सतीश जेवरिया, डेकाडो कॉइनचा मालक रणजित सक्सेना, दिव्येश दर्जी, विरेश चरंतीमठ, रंकेश दिव्येश दर्जी, मेहुल पाचीगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१६ ते जून २०२१ दरम्यान घडला.

अधिक माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एटीसीसी कॉइन, दिखादो कॉइन व इतर खोट्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो, अशी आमिषे दाखवून वेगवेगळ्या प्रॉझी स्किम बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या मूळ गुंतवणूक केलेल्या ५४ बिटकॉइनवर परतावा म्हणून १६६ बिटकॉइन मिळाल्याचे त्यांना भासविले. त्यानंतर दिव्येश दर्जी आणि विरेश चरंतीमठ यांच्या सांगण्यावरून पुन्हा वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीच्या प्रॉझी स्किममध्ये २२० बिटकॉइन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर एकही बिटकॉइन दिसून आली नाही.

यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सध्या एका बिटकॉइनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये इतका आहे. त्याअर्थी त्यांच्या मूळ ५४ बिटकॉइनचे एकूण १० कोटी ४५ लाख रुपये इतकी किंमत आहे. त्यांनी आपली २२० बिटकॉइन म्हणजे ४२ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Lawyer cheated out of crores on the pretext of investment Case against 7 persons including Bitconnect's Satish Kumbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.