शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

शेवटी काय तर...३ कोटी खर्च करुन नेहरु स्टेडियममध्ये प्रकाश पडलाच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 9:16 PM

पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी  येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र...

ठळक मुद्देचुकीच्या ठिकाणी यंत्रणा बसविल्याने खेळाडूंना त्रास स्टेडियमचे विद्युत रोषणाईचे काम सुरु असताना कामावर काँग्रेसचा आक्षेप

पुणे: स्वारगेट येथील पंडित नेहरु स्टेडियममध्ये रात्रंदिवस सामने खेळण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून खास विद्युत यंत्रणा बसविण्यात आली. परंतु, ही यंत्रणा बसविताना तांत्रिकदृष्ट्या चूक झाल्याने गेल्या दोन वर्षांत या विद्युत रोषणाईचा प्रकाशच पडला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळी विद्युत रोषणाईची यंत्रणा बसवून देखील रात्रीचा एकही सामना झालेल्या नाही. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये नेहरु स्टेडियम हे एकमेव क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहे. यात २५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये अनेक महत्वाचे एकदिवसीय सामने खेळण्यात आले. परंतु, आयसीसीने स्टेडियमच्या नियमावलीत काही बदल केल्याने स्टेडियममध्ये ५ नोव्हेंबर २००५ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामना खेळविण्यात आला. शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी व इतर अनेक लहान-मोठे राज्यस्तरीय, महाविद्यालयांचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी या स्टेडियमला पसंती दिली जाते. पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी  येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र, कंपनीने विदयुत रोषणाईचे काम करत असताना चुकीच्या पध्दतीने खांब लावल्यामुळे स्टेडियमवर अंधार पडत आहे. त्याचबरोबर खेळाडूंचा चेहयावर सुध्दा लाईट येत असल्यामुळे येथे सामना खेळता येत नाही.याविषयी काँग्रेसचे  माजी नगरसेवक संजय बालगुडे म्हणाले, स्टेडियमचे विद्युत रोषणाईचे काम सुरु असताना कामावर आक्षेप घेण्यात  आला होता. यावेळी प्रशासनाला यासंदर्भात पत्र व्यवहार करुन चुकीच्या पध्दतीने काम होत असल्याची तक्रार केली होती. यामधील एक खांब चुकीच्या पध्दतीने लावल्यामुळे स्टेडियमवर अंधार पडत आहे. त्यामुळे विदयुत रोषणाई करुन सुध्दा  स्टेडियमध्ये अंधारच असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------स्टेडियमचे विद्युत रोषणाईचे काम करत असतान एका खांबाची स्थान चुकले आहे. त्यामुळे संपुर्ण स्टेडियमवर रोषणाई पडत नाही. आम्ही यासंदर्भात ठेकेदाराबरोबर चर्चा केली असून खांबाची जागा बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. - श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता विद्युत विभाग

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेस