शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पूल मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: February 18, 2017 02:43 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपरी-साकेरी यादरम्यान असणारा जुना पूल अखेरच्या घटका मोजत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपरी-साकेरी यादरम्यान असणारा जुना पूल अखेरच्या घटका मोजत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यामध्ये असणारा पिंपरी व साकेरी ही दोन गावे जोडणारा गुहीरा या नदीवरील पूल जुना झाल्याने हा पूल मृत्युचा सापळा बनला आहे. अत्यंत धोकादायक असणाऱ्या या पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याचप्रमाणे जुना झालेल्या या पुलाची दगडी कोसळत आहेत. पिंपरी व साकेरी ग्रामस्थांनी या पुलाबाबत प्रशासनाला कळवले असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे साकेरी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कढण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पिंपरीवरुन साकेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुहीरा नदीवर असलेल्या या पुलाच्या पुढे साकेरी गावठाण, गवारवाडी, खडकवाडी, मोहंडुळेवाडी, वनघरटेप, आडारीवस्ती, कारोटेवस्ती, या गावातील ग्रामस्थांची नेहमीच या पुलावरुन वर्दळ असते. साकेरी व या परिसरातील गावातील शाळेतील मुलांना या पुलावरुनच ये-जा करावी लागते. कठडा नसलेल्या व दुरवस्था झालेल्या या पुलावर ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.श्रावण महिन्यामध्ये पिंपरी येथील महिला साळाबाई बांबळे या जनावरे चरावयासाठी पुलावरुन पलीकडे जात असताना पाय घसरुन नदीत पडून मृत्यू पावल्या. या पुलाला कठडे असते तर या महिलेचा जीव वाचला असता. आम्ही ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ही मोठी घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही, असे साकेरी ग्रामस्थ अशोक तारडे व मच्छिंद्र कढण यांनी सांगितले. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादू गवारी, साकेरीचे ग्रामस्थ अशोक तारडे, मच्छिंद्र कढण, होनाजी आढारी, सखाराम आढारी यांनी केली आहे. (वार्ताहर) साकेरी हे गाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अत्यंत डोेंगरदऱ्या-खोऱ्यामध्ये वसलेले गाव असून, या गावामध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. साठ ते सत्तर घरे असणाऱ्या गावामध्ये दळणवळणासाठी गेली कित्येक वर्षांपूर्वी गुहीरा नदीवर पूल बांधण्यात आला. यामुळे या गावांचा संपर्क पाटण खोऱ्याशी येऊ लागला. या गावामध्ये आजारी पडलेल्या ग्रामस्थाला डोली करून दहा किमी असणाऱ्या तळेघर येथे आणावे लागत असे, परंतु हा पूल झाल्यानंतर या गावातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला होता.