शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

HSRP Number Plate: एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:59 IST

गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती

पुणे : राज्य परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा पाटी’ (एचएसआरपी) २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा अडीच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ही मुदतवाढ अंतिम असून, १ डिसेंबरपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील २०१९च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पुण्यात एकूण २६ लाखांपेक्षा जास्त वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी रोझमार्टा कंपनीला काम देण्यात आले असून, ही नंबरप्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबरप्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी लागणारा कालावधी अधिक जात आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.

१९ लाख वाहने ‘एचएसआरपी’विना 

आत्तापर्यंत केवळ पावणे आठ लाख चालकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यातल्या साडेपाच लाख वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. त्यामुळे नंबरप्लेट बसवून घेण्याचा वेग कमी असून, अजूनही १९ लाख वाहनांनी नोंदणी अर्ज दाखल करणे बाकी आहे. तसेच ज्यांना नंबरप्लेट बसविण्याची तारीख दिली, तिही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारी परिवहन विभागाने चाैथ्यांदा पुन्हा दि. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणून मुदतवाढ 

-राज्यातील २०१९ पूर्वीच्या केवळ १५ ते १७ टक्के वाहनधारकांकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आले आहे.-मुदत १५ ऑगस्ट असले तरी अनेक वाहनांना सप्टेंबर महिन्यातील अपाॅइंटमेंट मिळालेली आहे.-ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची संख्या कमी आहेत.-काही फिटमेंट केंद्रचालकांकडून केंद्र बंद करण्यात आले आहे.-नागरिकांकडून एचएसआरपी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकcarकारRto officeआरटीओ ऑफीसMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसा