शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

कात्रज-कोंढवा रस्त्याचा भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला  

By राजू हिंगे | Updated: December 27, 2024 21:07 IST

केवळ १८ हजार २५० चौरस मीटर जागा तडजोडीने ताब्यात आली आहे.

पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०१७ मध्ये ७१५ कोटींचा गरज होती; पण आता हा खर्च १ हजार १०० कोटींवर गेला आहे. त्यामुळे सात वर्षांत भूसंपादनाचा खर्च ४०० कोटींनी वाढला आहे. गेल्या सात वर्षांत महापालिकेने तडजोडीने केवळ ६ टक्के जागा म्हणजे केवळ १८ हजार २५० चौरस मीटर जागा तडजोडीने ताब्यात आली आहे.कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपी रोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते महापालिका हद्दीत पिसोळीपर्यंत आहे. महापालिकेने २०१८ मध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. आता सहा वर्षे झाली, तरीही भूसंपादनाअभावी काम रेंगाळले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम सलग न झाल्याने नागरिकांना या रस्त्याचा फारसा फायदा होत नाही. भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची अखेर रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.पूर्वीच्या ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदीचा हा रस्ता निश्चित केला होता. त्यानुसार भूसंपादनासाठी शासनाकडे २८० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० टक्के रक्कम म्हणजे १३९ कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम येऊन अनेक महिने झाले तरीही अजून जागा ताब्यात आलेल्या नाहीत. गेल्याच आठवड्यात महापालिकेत झालेल्या बैठकीत ५० मीटरऐवजी संपूर्ण ८४ मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूसंपादनासाठी शासनाकडे ४०० कोटी रुपये मागितले जाणार आहेत.आणखी २ लाख ७५ हजार ५०० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. महापालिकेकडे सध्या शासनाने दिलेले १३९ कोटी आणि महापालिकेने केलेली तरतूद ७२ कोटी अशी २११ कोटींची तरतूद सध्या उपलब्ध आहे. भूसंपादन करण्यासाठी अजून ८८३ कोटी रुपयांची गरज आहे. त्यातील ५० टक्के निधी शासनाने द्यावा, अशी मागणी केली आहे.नागरिकांनी टीडीआर, एफएसआय घ्यावा, यासाठी प्रयत्न केला जातो; पण त्यासाठी महापालिकेची प्रक्रिया ही अतिशय किचकट आहे; तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सहकार्य केले जात नाही. प्रत्येक विभागात फाइल थांबवली जाते. त्रुटी काढल्या जातात, अडवणूक केली जात असल्याने जागामालक त्रासाने हैराण होतात. तसेच अनेकजण जमीनदार नसल्याने त्यांना टीडीआर व एफएसआय घेऊन करायचे काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळेच महापालिकेकडून थेट रोख रक्कम घेण्यावर भर आहे. त्यामुळे भूसंपादनचा खर्च वाढला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkatrajकात्रजroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसkondhvaकोंढवा