शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लालन सारंग : बोल्ड भूमिकांबरोबरच अभिनयाचाही कस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 06:04 IST

रंगमंचावर ज्या भूमिका करायचे कुणी धारिष्ट्य दाखविणार नाही अशा ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा असो की ‘जंगली कबूतर’मधील ‘गुल’ या बोल्ड भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगभूमीवर नवा अध्याय सुरू केला.

पुणे  - रंगमंचावर ज्या भूमिका करायचे कुणी धारिष्ट्य दाखविणार नाही अशा ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा असो की ‘जंगली कबूतर’मधील ‘गुल’ या बोल्ड भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगभूमीवर नवा अध्याय सुरू केला. केवळ प्रतिमांमध्ये न अडकता अभिनयाचा कस लावणाऱ्या ‘सूर्यास्त’, ‘रथचक्र’सारख्या नाटकांमधूनही त्यांनी सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले.त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीच्या कारकिर्दीला २०१७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली.लालन सारंग या मूळच्या गोवेकरी. २६ डिसेंबर १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयातच त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले. कमलाकर सारंग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षे त्या रंगभूमीपासून दूरच राहिल्या. त्यानंतर नोकरी सोडून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत एक नाटक आणि त्यानंतर अत्रे थिएटर्सच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीचा श्रीगणेशा त्यांनी केला. ‘लग्नाची बेडी’ नाटकात यामिनीची भूमिका करताना त्यांनी गाणेही गायले. संजीवकुमार, राजेश खन्ना यांच्याबरोबर त्यांनी हिंदी रंगभूमीही गाजवली. सत्यदेव दुबे यांच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. कणकवलीतील ८७व्या मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.बाइंडरची ‘चंपा’१९७१ मध्ये कमलाकर सारंग यांच्या हातात विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बार्इंडर’ हे नाटक आले. तेंडुलकरांनी ‘चंपा’च्या भूमिकेसाठी त्यांना नाकारले होते; पण त्यांचे ‘स्टील फ्रेम’ नाटक पाहून त्यांना संधी दिली. कमलाकर सारंग यांचे पहिलेच दिग्दर्शन वादग्रस्त ठरले. शिवसेनेने नाटक बंद पाडले. सेन्सॉरविरुद्ध लढा द्यावा लागला. या संघर्षाच्या काळात त्या पतीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.अभिनयाचा कसआक्रोश (वनिता), आरोप (मोहिनी), उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला (सरिता), कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय), खोल खोल पाणी (चंद्राक्का), गिधाडे (माणिक), घरकुल, घरटे अमुचे छान (विमल), चमकला ध्रुवाचा तारा, जंगली कबुतर (गुल), जोडीदार (शरयू), धंदेवाईक (चंदा) बिबी करी सलाम, बेबी (अचला), मी मंत्री झालो, रथचक्र ( ती), संभूसांच्या चाळीत, सहज जिंकी मना (मुक्ता) अशा अनेक नाटकांमधून स्वत:चे वेगळेपण त्यांनी सिद्ध केले.गोवेकरणीचे ‘मासेमारी’सीफूड बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. पुण्यात ‘मासेमारी’ नावाचे हॉटेल त्यांनी सुरू केले. या पदार्थांसाठी त्या स्वत: मसाले तयार करायच्या. या पाककृतींवर आधारित पुस्तकेही त्यांनी लिहिली.आम्ही एकाच नौकेचे प्रवासी होतो. आम्ही दोघांनी आयएनटीच्या ‘हवा अंधारा कवडसा’ या नाटकात एकत्र भूमिकाही केली होती. लालन गेली तरी भूमिकांच्या माध्यमातून ती कायमच अजरामर राहील. - डॉ. मोहन आगाशे‘सखाराम बार्इंडर’ मधील सखाराम बरोबर चंपाची भूमिकाही मैलाची दगड ठरणारी होती. चंपा हे अतिशय रांगडे आणि वेगळ्या धाटणीचे व्यक्तिमत्व होते. ते काम आश्वासक पद्धतीने लालनने साकारले. तिच्या निधनाने रंगभूमीचे नुकसान झाले आहे. - डॉ. जब्बार पटेल

टॅग्स :Deathमृत्यू