लाल महालला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवणार

By श्रीकिशन काळे | Updated: January 12, 2025 16:25 IST2025-01-12T16:24:22+5:302025-01-12T16:25:38+5:30

महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सत्कार सोहळा

Lal Mahal to be made an international standard monument | लाल महालला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवणार

लाल महालला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवणार

पुणे : ‘‘राष्ट्रमाता जिजाऊंचे वास्तव्य असलेला पवित्र लाल महाल पुणे मनपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार आहे. लालमहाल हे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे ते चांगले स्मारक करण्यात येईल, असे प्रतिपादन पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केले.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन या संघटनांनी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी रत्नप्रभा देशमुख, कमल जाधव, शुभांगी शिवतरे, नर्मदा कोकाटे, इंद्रायणी बालगुड़े, संगीता गोळे, सुशीला खेडेकर,मंगल शेवकरी, प्रमिला खांदवे (पाटील), चांगुणाबाई बराटे यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने अश्विनी नायर यांना कर्तुत्ववान महिला पुरस्कार डॉ. सीमा गायकवाड (कराडे) व कु. छाया काविरे यांना तर राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार स्नेहल शैलेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला.

या वेळी अखिल शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष विकास पासलकर सारथीचे संचालक अशोक काकडे, आमदार बापू पठारे, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डूबल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, रणजित शिवतरे, विठ्ठलराव जाधव, मारुतराव सातपुते, ॲड. मिलिंद पवार, दत्ताभाऊ सागरे हनुमंत पवार, विराज तावरे उपस्थित होते. 

Web Title: Lal Mahal to be made an international standard monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.