शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:41 IST

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट..

ठळक मुद्देदिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी राज्यकर्ते प्रयत्नशील फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ

पुणे : वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. राजकारण्यांना हे हवेच होते. त्यांनी त्याला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत लोकांच्या विश्वासार्हतेशी तडजोड करण्यास भाग पाडले. याचा गंभीर परिणाम माध्यमांवर झाला. त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. तर वाचकांनी देखील माध्यमांना गृहीत धरणे हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱ्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानाचे वक्ते म्हणून सोमवारी गुप्ता बोलत होते. त्यांनी "आज सर्वाधिक धोका कशाला ? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ? याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, आता माध्यमामध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी अनेकदा जगभरातील राज्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येतात.'आपण स्वत:चीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने आणि हे न आल्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्तां यांनी यावेळी सांगितले. .....................................* फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ आहेत. प्रस्थापित माध्यमातून ज्यावेळी फेक न्यूज सातत्याने दिल्या जातात अशावेळी त्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून भविष्यात फेक न्यूजच्या प्रभावाला वाचकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. अशी टिप्पणी गुप्ता यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारMediaमाध्यमेFake Newsफेक न्यूज