Krishnarao Bhegade Passes Away : शोकाकुल वातावरणात कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:53 IST2025-07-01T11:53:15+5:302025-07-01T11:53:53+5:30
माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी मावळ तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

Krishnarao Bhegade Passes Away : शोकाकुल वातावरणात कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात
तळेगाव दाभाडे : मावळ परिसराला प्रगतिपथावर नेणारे प्रतिभासंपन्न, ध्येयवादी नेतृत्व अशी माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे यांची ओळख होती. मावळच्या विकासाचा झंझावाती शिल्पकार हरपला, अशी भावना त्यांच्या निधनानंतर तालुक्यातून व्यक्त होत आहे. आज शोकाकुल वातावरणात कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी मावळ तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर, बापूसाहेब भेगडे, उद्योजक रामदास काकडे, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, चंद्रकांत शेटे,संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, गणेश भेगडे, किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, दीपक हुलावळे, बाबुराव वायकर, साहेबराव कारके, तुकाराम असवले,अर्चना घारे, काळूराम मालपोटे, तानाजी दाभाडे, चंद्रकांत काकडे, चंद्रजीत वाघमारे , अरुण माने, जयंत कदम, संदीप काकडे, डॉ. संभाजी मलघे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, दत्तात्रय पडवळ, किशोर राजश, बाळासाहेब शिंदे, यादवेंद्र खळदे , महादूबुवा कालेकर,, संतोष परदेशी, शंकरराव शेळके, लक्ष्मण बालगुडे, वैशाली दाभाडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.