शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कोथरूड भाजपचाच... पण उमेदवारी कोणाला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:58 IST

भाजपचे मताधिक्क्य पाहता जागावाटपात काही हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हेच कार्यकर्त्यांनी गृहित धरून ‘आदेश’ येण्याची वाट पाहणे पसंत केले आहे़.. 

ठळक मुद्देविरोधकांना मात्र अस्तित्व दाखविण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध

पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्य देणाºया कोथरूड विधानसभा मतदारसंघाने आजपर्यंत नेहमीच भाजपची साथ दिली आहे़. परंतु, या निवडणुकीत विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार की, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार, हा सध्या उत्सुकतेचा विषय बनला आहे़. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या या मतदारसंघात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध असल्याचे चित्र आहे़. दरम्यान, भावी आमदार म्हणून कार्यरत असलेले काही जण भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा मिळेल, या आशेवर मोर्चेबांधणी करीत आहेत़.  भाजपला अनुकूल असलेल्या कोथरूडमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा अधिक मते मिळाली होती़. यामुळे भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, म्हणून पक्षातील १२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या़. यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्यासह पुणे मनपाचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यत्वे चर्चिले जात आहे़. या दोघांमधील उमेदवारीकरिताची चढाओढ व मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी ही तर शहरात चर्चेचा विषय ठरली गेली़. या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या दोघांनाही झुलत ठेवले आहे़ .महाजनादेश यात्रेत विद्यमान आमदार म्हणून कुलकर्णी यांना स्थान दिले तर, गणेशोत्सवात आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही मोहोळ यांच्या गणेश मंडळाला भेट देऊन केलेली आरती यामुळे मोहोळ यांचेही महत्त्व वाढविले आहे़. या घडामोडीत भाजपचे मताधिक्क्य पाहता जागावाटपात काही हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हेच कार्यकर्त्यांनी गृहित धरून ‘आदेश’ येण्याची वाट पाहणे पसंत केले आहे़. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तगडा उमेदवार या ठिकाणी नाही़. कोथरूड मतदारसंघात मराठा कार्ड चालणार नाही, हे माहीत असल्याने केवळ आपले अस्तित्व दाखविण्याकरिता तरी त्यांना येथे उमेदवार देणे गरजेचे ठरत आहे़. राष्ट्रवादीकडून येथे पक्षातील इच्छुकांकडे चाचपणी सुरू असतानाच बाहेरचा तगडा उमेदवार गळाला लागतो का यासाठीही प्रयत्न सुरू आहेत़. तर मनसेकडून निवडणूक लढविण्याविषयी अधिकृत घोषणा न झाल्याने या पक्षातील इच्छुकांतही तळ्यात मळ्यात आहे़. अशा वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणारे आशिष कांटे यांनीही गेल्या काही दिवसांपासून आपले लक्षवेधी अस्तित्व दाखवून दिले आहे़. मात्र भाजपच्या लाटेत त्यांची ही नाव किती तरणार, हाही प्रश्न आहे़. ............ * ज्येष्ठांचे मतदान लक्षवेधी    कोथरूड मतदार संघातील एकूण मतदार संख्या ४ लाख ३ हजार २२१ इतकी आहे़. यापैकी सर्वाधिक मतदार हे एरंडवणा, कर्वेनगर व कोथरूड परिसरात आहे़. यामध्ये ३१ ते ६० वयोगटातील मतदारांची संख्या ही सुमारे अडीच लाख आहे़ तर ज्येष्ठ मतदारांची संख्या ८० हजाराहून अधिक आहे़. यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ मतदारांचे मतदान हे लक्षवेधी आहे़ त्यातच बहुतांशी मतदार हे सोसायट्यांमधील असून, ते उच्च शिक्षित आहेत़ तसेच निवृत्तीनंतरचे जीवन जगणार्यांची संख्याही येथे मोठी आहे़. -----* भाजपाचा पारंपारिक मतदार निवडणूक आली की जाती-पातीचे राजकारण हे नवीन नाही़. प्रत्येक निवडणुकीत कोथरूड मतदारसंघाकडे हा ब्राम्हणबहुल मतदार संघ म्हणून पाहिले जाते़.  मात्र, कोथरूड हा भाजपाचा पारंपारिक मतदार संघ आहे हे बोलणेच संयुक्तिक ठरेल़. विशिष्ट जातीचा उमेदवार उभा केला म्हणून आपल्याला फायदा होईल ही शक्यता आण्णा जोशी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीने फोल ठरवून दाखविली आहे़. उलट यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनीच बाजी मारली होती़. त्यामुळे कोथरूड हा भाजप-सेनेचा बालेकिल्ला असून, गत लोकसभा निवडणुकीतील मिळालेल्या लाखाच्या मताधिक्क्याने हे अधोरेखित केले आहे़. --------------* सर्वाधिक नगरसेवकही भाजपचे कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिकेचे एकूण २३ नगरसेवक आहेत़. यापैकी १७ नगरसेवक हे भाजपाचे असून, शिवसेनेचा एक नगरसेवक आहे़ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत़. ........... निवडणूक आली की जाती-पातीचे राजकारण हे नवीन नाही़ प्रत्येक निवडणुकीत कोथरूड मतदारसंघाकडे हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ म्हणून पाहिले जाते़. मात्र कोथरूड हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे बोलणेच संयुक्तिक ठरेल़. .......विशिष्ट जातीचा उमेदवार उभा केला, म्हणून आपल्याला फायदा होईल ही शक्यता अण्णा जोशी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीने फोल ठरवून दाखविली आहे़. उलट यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनीच बाजी मारली होती़ त्यामुळे कोथरूड हा भाजप-सेनेचा बालेकिल्ला असून, गत लोकसभा निवडणुकीतील मिळालेल्या लाखाच्या मताधिक्क्याने हे अधोरेखित केले आहे़. ..........उमेदवारीचा निर्णय पक्ष घेत असतो, पक्षाच्या आदेशाप्रमाणे आजतागायत आम्ही काम करीत आलो आहोत आणि पक्ष देईल. त्या निर्णयानुसार पुढची वाटचाल मी करेऩ - मेधा कुलकर्णी, विद्यमान आमदार, भाजप.........सन २०१४ च्या निवडणुकीत मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती़. तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही़. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक असून, पक्षाकडे मी उमेदवारीही मागितली आहे़. शेवटी पक्ष संधी देईल या आशेवर मी आहे़ पक्षाने संधी दिली तरी चांगलेच आहे, नाही दिली. तर पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे मी काम करणाऱ - मुरलीधर मोहोळ, भाजपचे इच्छुक उमेदवार, माजी स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा.............राजकीय पार्श्वभूमी नसताना, जनतेच्या प्रश्नांची असलेली जान व त्यावरील माझ्याकडे असलेले ठोस उपाय याकरिता मी निवडणूक लढविणार असून, युवकांचे संघटन व जनतेचा पाठिंबा यावर मी नक्की विजयी होईऩ - आशिष कांटे, इच्छुक अपक्ष उमेदवाऱ..............राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे़ निवडणुकीसाठी मी तयार असून, पक्ष देईल तो आदेश मी मान्य करेल़ - किशोर शिंदे, मनसे

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस