Koregaon- Bhima Violence : सीआयडीकडून राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 01:30 PM2018-06-08T13:30:08+5:302018-06-08T16:02:27+5:30

कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत.

Koregaon-Bhima Violence: Rahul Phatangale's death, photo of suspects released by CID | Koregaon- Bhima Violence : सीआयडीकडून राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

Koregaon- Bhima Violence : सीआयडीकडून राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

Next

पुणे -  कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत. या तिन्ही आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.

राहुल फटांगळे हत्या प्रकरणी एक व्हिडीओ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हाती आला आहे. व्हिडीओमध्ये फटांगळेला काही व्यक्ती काठीने मारत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे सीआयडी चार संशयितांचा शोध घेत आहे.  व्हिडीओच्या त्याआधारे चार जणांचे फोटोदेखील सीआयडीने प्रसिद्ध केले आहेत. आरोपींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  शिक्रापुर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भादंवि ३०२, १४३, १४७,१४८,१४९, सह मुंबई पो.अधि. १९५१ चे कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास 5 फेब्रुवारी रोजी सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. 
फटांगळे हत्या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन जण अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. तर एकजण औरंगबादचा रहिवासी आहे. त्यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर व्हिडीओच्या आधारे सीआयडी आणखी चार संशयितांचा शोध घेत आहे, अशी माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक पी. पी. अक्कानवरू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

सन्मान मोर्चामध्ये राहुल फटांगळेच्या आईचा आक्रोश
कोरेगाव-भीमा आणि परिसरात झालेल्या हिंसाचारात  राहुल फटांगडे (वय ३० वर्ष) तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलची हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्हिडीओ फुटेज, मोबाइल कॉल रेकॉर्ड, मोबाइल ड्रम डाटा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील तिघांना अटक केली होती. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असा दावा पोलिसांनी केला होता.

नेमके काय आहे प्रकरण?
1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा करत असताना,  परिसरात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकदेखील झाली. यात राहुल फटागंळे मृत्युमुखी पडला.

 

सहकार्य करण्याचे आवाहन

सीआयडीला स्थानक पोलिसांकडून दंगलीची व्हिडीओ क्लीप मिळाली आहे. फटांगळेला मारहाण करणा-याचे फोटो त्या क्लिपवरून काढण्यात आले आहेत. या क्लिप व फोटोमधील व्यक्तींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीशी संपर्क  साधावा. त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे आवाहन अक्कानवरू यांनी केली आहे. 
संपकार्साठी कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे :- पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पथक मध्यवर्ती इमारत, साधु वासवानी रोड, पीडीसीसी बँकेजवळ, पुणे. मोबाइल क्रमांक :- 9049650789
 
हल्ला केल्याचे आरोपींने केले कबूल 

यापुर्वी अटक केलेल्या तीन आरोपींनी तपासादरम्यान फाटांगडे यांना मारल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी अहमदनगरमधील एका मंडळाचा टी-शर्ट घातला होता. त्यामुळे त्यांना त्वरीत अटक करणे शक्य झाले, असे अक्कानवरू यांनी सांगितले.  

Web Title: Koregaon-Bhima Violence: Rahul Phatangale's death, photo of suspects released by CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.