पुणे : महाराष्ट्र व विशेषतः पुणे जिल्हा हा कोरियन उद्योजकांसाठी गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. ऑटोमोबाइल व उत्पादन क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी कोरियन गुंतवणूकदार अत्यंत सकारात्मक असून, ४० पेक्षा जास्त कंपन्यांनी आगामी काळात जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली.
पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे ‘एमआयडीसी’, ‘कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी’ आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी भारत-कोरिया उद्योगांना चालना देण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे ‘पीसीयू-कोरिया फॅसिलिटेशन सेंटर’ची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून उद्योग, कौशल्य विकास आणि संशोधन, या क्षेत्रांना जोडणारा दुवा निर्माण केला जाणार आहे.
पी. वेलरासू यांनी जाहीर केले की, कोरियन उद्योगांच्या समन्वयासाठी लवकरच ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येईल, तसेच गुंतवणूकदारांच्या अडचणी सोडवण्यास दर ३ महिन्यांनी मुंबईतील कोरियन वाणिज्य दूत आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे विशेष संवाद सत्र आयोजित केले जाईल. यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक परिसंस्थेला नवे बळ मिळणार आहे.(वा.प्र.)
Web Summary : Maharashtra, especially Pune, attracts Korean investors in auto and manufacturing. Over 40 companies eye land purchase. PCU-Korea Facilitation Center launches, boosting industry ties and skill development. Single-window clearance soon.
Web Summary : महाराष्ट्र, विशेष रूप से पुणे, ऑटो और विनिर्माण में कोरियाई निवेशकों को आकर्षित करता है। 40 से अधिक कंपनियां भूमि खरीदने की इच्छुक हैं। पीसीयू-कोरिया सुविधा केंद्र का शुभारंभ, उद्योग संबंधों और कौशल विकास को बढ़ावा। जल्द ही सिंगल-विंडो मंजूरी।